अमिषा पटेलवर करोडोंची फसवणूक केल्याचा आरोप; झारखंड हायकोर्टानं दिला दणका

बॉलीवूड अभिनेत्री अमिषा पटेलनं झारखंड हायकोर्टात केलेल्या क्वैशिंग याचिकेवर आज ५ मे,२०२२ रोजी सुनावणी झाली.
Ameesha Patel
Ameesha PatelGoogle

बॉलीवूड अभिनेत्री अमिषा पटेलला(Ameesha Patel) झारखंड हायकोर्टानं(Jharkhand High Court) मोठा दणका दिला आहे. अमिषानं रांची कोर्टात ती आणि तिच्या पार्टनर विरोधात सुरू असलेल्या फसवणूकीच्या केससंदर्भात सुरु असलेली कार्यवाही थांबवण्यासाठी हायकोर्टात याचिका केली होती. या याचिकेवर झारखंड हायकोर्टात सुनावणी झाली आहे. न्यायमूर्ती एस.के.द्विवेदी यांच्या पुढे या प्रकरणाची सुनावणी पार पाडली. सुनावणीनंतर कोर्टानं अमिषा पटेलची याचिक रद्दबातल ठरवली आहे. हायकोर्टाच्या या आदेशानं मात्र अमिषा पटेलला मोठा झटका लागला आहे.

Ameesha Patel
कोण भंग करतय देशाची शांती? 'अनेक'च्या ट्रेलरमधून आयुषमानचा मोठा खुलासा

अमिषा पटेल आणि तिचे बिझनेस पार्टनर कुणाल गूमर यांच्या विरोधात फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणात दोघांविरोधात आरोपपत्रही दाखल करण्यात आलं होतं,ज्यानंतर हे प्रकरण कोर्टात पोहोचलं. एका सिनेमाच्या प्रमोशन आणि पब्लिसिटीसाठी अमिषा आणि तिच्या पार्टनरनं रांची इथे राहणाऱ्या निर्माता अजय कुमार सिंगकडून २.५ करोड रुपये घेतले होते. सिनेमा पूर्ण झाल्यानंतर हे पैसे व्याजासकट परत करायचं ठरलं होतं. परंतु २०१३ मध्ये या सिनेमाचं शूटिंग सुरू होऊनही अद्याप पूर्ण होऊ शकलं नाही. त्यामुळे अजय सिंगने कर्ज दिलेल्या पैशाची मागणी करायला सुरुवात केली. अमिषा आणि तिचा पार्टनर यांच्यावर आरोप आहे की पैसे देण्याकडे ते दुर्लक्ष करीत आहेत.

Ameesha Patel
पत्रकार मारहाणी प्रकरणात सलमान खानला 13 जूनपर्यंत हायकोर्टाचा दिलासा

अमिषा पटेलनं दाखल केलेल्या याचिकेवर झारखंड हायकोर्टात २८ एप्रिल रोजी सुनावणी होती. ही सुनावणी न्यायमूर्ती संजय कुमार द्विवेदी यांच्यासमोर झाली होती. या सुनावणी दरम्यान दोन्ही पक्षांकडून आपले मुद्दे मांडण्यात आले. कोर्टानं दोन्ही पक्षांना ऐकल्यानंतर प्रकरणाचं गांभीर्य लक्षात घेत दोन्ही पक्षांना लेखी स्वरुपात आपली बाजू मांडण्याचे आदेश दिले. यासाठी कोर्टानं दोन्ही पक्षांना दोन आठवड्यांचा कालावधी दिला होता. अमिषातर्फे यासंदर्भात बाजू मांडताना लिहिलं गेलं आहे की,आमच्यावर लावलेले आरोप खोटे आहेत,काल्पनिक आहेत. कोर्टानं नियमांच पालन न करता आपलं मत मांडलं आहे. खालच्या कोर्टानं या प्रकरणात जो निर्णय दिला आहे तो आम्हाला मान्य नाही,तो रद्द करायला हवा. या प्रकरणात सुनावणी करण्यासाठी ५ मे ही तारीख दिली होती.

Ameesha Patel
ट्रेनमध्येच रंगली आयुषमान- नीना गुप्तांची मैफल; व्हिडिओ व्हायरल...

निर्माता अजय कुमार सिंगचं म्हणणं आहे,अमिषा पटेल आणि कुणाल गूमर यांनी २.५ करोड रुपये 'देसी मॅजिक' या सिनेमाच्या निर्मितीसाठी आणि पब्लिसिटीसाठी घेतले होते. सिनेमाचं शूटिंग २०१३ मध्ये सुरू झालं होतं,परंतु आतापर्यंत हा सिनेमा रिलीज झाला नाही. त्यामुळे अजय कुमारनं आपले पैसे अमिषाकडे मागायला सुरुवात केली. पण अमिषानं यावर पैसे देण्यासाठी टाळाटाळ सुरु केली. याचिकाकर्त्याच्या वकीलांनी आपला पक्ष मांडताना म्हटलं आहे की, देशभरात अनेक कोर्टात अमिषाच्या विरोधात फसवणुकीचे केसेस सुरू आहेत. त्यामुळे या केसमध्ये तिला सोडता कामा नये. दोन्ही पक्षांची बाजू समजून घेतल्यानंतर अमिषानं फसवणूकीच्या तक्रारी विरोधात केलेल्या याचिकेला हायकोर्टानं रद्दबातल केलं आहे. आता यामुळे अमिषाला काय शिक्षा होईल याकडे सगळ्याचं लक्ष लागून राहिलं आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com