पिक्चर फ्लॉप झाल्यास कलाकारांचं मानधन...; आलिया भट 'लाईमलाईट'मध्ये

आलिया भटने नुकतंच एका मुलाखतीत बोलताना स्टार्सला मिळणारा मोबदला, त्यांचा पगार याविषयी भाष्य केलंय.
Alia Bhatt
Alia BhattSakal

बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. तिचे नवे चित्रपट, गरोदरपण आणि आता तिची काही मतं. एका मुलाखतीत तिने मांडलेल्या मतांची सध्या जोरदार चर्चा होतेय. स्टार्सला मिळणारा मोबदला, त्यांचा पगार याविषयी तिने भाष्य केलंय.

Alia Bhatt
हृतिक विषयी समंथाचं मोठं वक्तव्य, म्हणाली,'त्याचे चाहते मला मारतील पण...'

एखादा पिक्चर फ्लॉप झाला, तर त्यातला कलाकारांना किती मोबदला मिळतो असा प्रश्न आलियाला एका मुलाखतीत विचारण्यात आला होता. त्यावर तिने सांगितलं की, चित्रपटाच्या बजेटच्या हिशोबाने कलाकारांचा मोबदला असायला हवा. पण कोणी किती पैसे घ्यावेत हे मी सांगणारी कोण? मी तर अजून खूप लहान आहे.

Alia Bhatt
20 दुचाकीस्वारांनी हातात रॉड घेऊन केला सलमान खानचा पाठलाग

आलिया पुढे म्हणाली की, अनेक कलाकार असेही आहेत की पिक्चर जर फ्लॉप झाला तर ते आपलं मानधन घेत नाहीत, किंवा मिळालेलं मानधन परत करतात. मला विचाराल तर या सगळ्यावर नीट विचार व्हायला हवा. निर्माते आणि कलाकारांनी सुद्धा या अँगलने विचार करायला हवा.

Alia Bhatt
Malaika आणि अर्जुन मध्ये बिनसलं? व्हायरल व्हिडीओनं रंगली चर्चा

आलिया भटचा डार्लिंग्ज हा चित्रपट लवकरच नेटफ्लिक्सवर येतोय. या चित्रपटाच्या माध्यमातून ती निर्माती म्हणून डेब्यू करतेय. आलियाचं प्रॉडक्शन हाऊस इटर्नल सनशाईन आणि शाहरुख खानचं प्रॉडक्शन हाऊस रेड चिलीज एंटरटेनमेंट या दोघांची निर्मिती असलेला डार्लिंग्ज चित्रपट ५ ऑगस्टला रिलीज होतोय.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com