Alia Bhatt Pregnancy:आलियाला गेले दिवस, आजींना आनंदाचे डोहाळे; म्हणाल्या...

आलिया भट्ट आणि रणबीर कपूर यांनी नुकतीच एक 'गूडन्यूज' पोस्ट शेअर केली,ज्यावर त्यांच्या कुटुंबियांकडूनही कौतूकाचा वर्षाव होतोय.
Alia Bhatt and Ranbir Kapoor announce pregnancy; Neetu Kapoor,Soni Razdan reacts
Alia Bhatt and Ranbir Kapoor announce pregnancy; Neetu Kapoor,Soni Razdan reactsGoogle

आलिया भट्ट(Alia Bhatt) आणि रणबीर कपूर(Ranbir Kapoor) यांनी नुकतंच ते आई-बाबा होणार असल्या संदर्भातील गूडन्यूज शेअर केली आहे. त्यांच्या या पोस्टवर त्यांच्या चाहत्यांनी आणि शुभचिंतकांनी अभिनंदनाचा वर्षाव केलेला आहे. या बातमीमुळे सध्या आलियाच्या सासुबाई यांचा उत्साह पाहण्यासारखा आहे. तर आलियाची आई सोनी राझदान कुटुंबात येणाऱ्या त्या चिमुकल्या पाहुण्याची वाट पाहण्यात गुंग होऊन गेल्यात. चला जाणून घेऊया नेमकं काय म्हणाल्यात या दोन आजी.(Alia Bhatt and Ranbir Kapoor announce pregnancy; Neetu Kapoor,Soni Razdan reacts)

नीतू कपूर सध्या छोट्या पडद्यावर एका रिअॅलिटी शोच्या परिक्षक म्हणून काम पाहतायत. त्यांना पापाराझीनं सेटवरच गाठलं आणि 'आजी होणार आहात कसं वाटतंय' असा थेट सवाल करुन टाकला. या प्रश्नावर उत्तर देताना नीतू कपूर भलत्याच खूश दिसल्या. त्या आपल्या आनंदाच्या भावना दोन मिनिटंही लपवू शकल्या नाहीत. भावूक होऊन त्यांच्या चेहऱ्यावर झळकलेलं हासू त्यांचा आजी झाल्याचा आनंद दाखवून गेलं. आपल्या आजी होण्याच्या आनंदाला व्यक्त करतानाच त्यांनी आपल्या मुलाच्या आगामी 'शमशेरा' सिनेमालाही मनभरुन शुभेच्छा दिल्या.

Alia Bhatt and Ranbir Kapoor announce pregnancy; Neetu Kapoor,Soni Razdan reacts
Alia Bhatt Pregnancy: वडील महेश भट्ट यांची पहिली प्रतिक्रिया...

तर आलिया-रणबीरच्या गूडन्यूजवर प्रतिक्रिया देताना होणाऱ्या आजी म्हणजे आलियाची आई सोनी राझदान यांनीही म्हटलंय की,''आनंदाची ही बातमी कळल्यानंतर आता नव्या पाहुण्याची वाट मी पाहू लागलीय. ती पाहणं खूप कठीण जातंय. ते चिमुकलं बाळ कधी माझ्या हातात मी घेतेय असं झालं आहे''. आलियाचे वडील ज्येष्ठ दिग्दर्शक महेश भट्ट यांनी सर्वात पहिल्यांदा कुटुंबातर्फे दोघांचे अभिनंदन करत प्रतिक्रिया दिली होती.

आलियानं तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक फोटो शेअर केला आहे. ज्यात ती हॉस्पिटलमध्ये एका बेडवर झोपली आहे,बाजूला पाठमोरा रणबीर तिच्याजवळ बसलाय,अन् जवळच्या(अल्ट्रासाऊन्ड) मॉनिटरच्या स्क्रिनवर हार्ट इमोजी दिसत आहे. या क्यूट फोटोला आलियानं कॅप्शन दिलंय,''Our Baby...coming soon''

Alia Bhatt and Ranbir Kapoor announce pregnancy; Neetu Kapoor,Soni Razdan reacts
'भारतीय बलात्कार संस्कृती...' प्राजक्ता माळी हे काय म्हणतेय?

रणबीरनं खरंतर 'शमशेरा' सिनेमाच्या प्रमोशन निमित्तानं आयोजित एका कार्यक्रमात बाळाच्या आगमनाची हिंट दिली होती अशी चर्चा आता सुरु झाली आहे. जेव्हा त्याला फॅमिली प्लॅनिंग विषयी विचारलं गेलं होतं तेव्हा तो म्हणाला होता,''मला खूप काम करायचं आहे,माझं कुटुंब बनवायचं आहे,त्यांच्यासाठी मला काम करायचंय. आधी मी स्वतःसाठी काम करायचो. पण आता कुटुंबासाठी करेन,खूप काम करेन''. आता आलियाच्या 'गूडन्यूज' पोस्टनंतर रणबीरचं हे वक्तव्य देखील जोरदार चर्चेत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com