
Alia Bhatt Pregnancy: 'तू प्रमोशनसाठी असं करत नाही ना?' नेटकऱ्यांचा प्रश्न
Alia Bhatt Pregnancy: आलिया - रणबीरची गुड न्युज ऐकून एकीकडे त्यांच्या चाहत्यांमध्ये आनंदाचे वातावरण असताना दुसरीकडे काही नेटकऱ्यांनी आलियाला ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे. आलिया आणि रणबीरचं दोन महिन्यांपूर्वी लग्न झालं. त्यानंतर आलियाची गोड बातमी (Alia Bhatt - Ranbir Kapoor) चाहत्यांना खटकताना दिसते आहे. त्यामुळे त्यांनी सोशल मीडियावरुन तिला ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे. काहींनी तिला थेट प्रश्न विचारुन खरं काय आहे ते सांगण्याची विनंती केली आहे. Alia Bhatt Pregnancy news
आलियानं तिच्या इंस्टावरुन शेयर केलेल्या त्या फोटोनं सर्वांचे लक्ष वेधले गेले आहे. आलिया आणि रणबीर त्या फोटोमध्ये असून त्यांच्या बाजुला असलेल्या सोनोग्राफीच्या मशीनवर एक (Social media viral news) इमोजी दिसतो आहे. आलियानं त्या फोटोला कॅप्शन देताना आमचं बाळ लवकरच येत आहे. असं म्हटलं आहे. त्यानंतर त्या पोस्टला मोठ्या प्रमाणात प्रतिक्रिया मिळण्यास सुरुवात झाली. आलियाची गोड बातमी वाऱ्यासारखी सगळीकडे पसरली. मात्र अनेकांनी ती गोष्ट खटकली असून त्यांनी आलिया आणि रणवीरला ट्रोल केले आहे.
हेही वाचा: Alia Bhatt Pregnant: आलिया - रणबीरच्या घरी हलणार पाळणा? फोटो शेयर
त्याचे कारण असे की, अयान मुखर्जी दिग्दर्शित आलिया रणबीरचा ब्रम्हास्त्र नावाचा चित्रपट सप्टेंबरमध्ये प्रदर्शित होणार आहे. याशिवाय रणबीरचा शमशेरा नावाचा चित्रपट जुलैमध्ये (Bramhastra Movie) प्रेक्षकांच्या भेटीला येतो आहे. त्यामुळे आलिया आणि रणबीर हे दोघेजण प्रमोशनसाठी असं काही करत तर नसतील ना अशा शंका काही नेटकऱ्यांना आहे. त्यामुळे त्यांनी बाई तू प्रमोशनसाठी तर असं काही करत नाहीस ना, अशा शब्दांत तिला विचारणा केली आहे. ट्विटरवरुन आलिया ट्रोल होत असल्याचे दिसून आले आहे.
हेही वाचा: Ranbir Alia Wedding:या बॉलीवूड सेलीब्रेटीज ने दिल्या रणबीर आलियाला लग्नाच्या शुभेच्छा
Web Title: Alia Bhatt Pregnancy Netizens Mixed Reaction Trolled Promotional Activity
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..