आलिया-रणबीरच्या लग्नाच्या पत्रिकेचा स्टायलिश लूक; पण सापडली मोठी चूक...Alia Bhatt | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

The invitation card for Ranbir Kapoor and Alia Bhatt's wedding

आलिया-रणबीरच्या लग्नाच्या पत्रिकेचा स्टायलिश लूक; पण सापडली मोठी चूक...

आलिया(Alia Bhatt)-रणबीर(Ranbir kapoor) हे लव्हबर्ड्स आज अखेर लग्नबंधनात अडकले. गेल्या काही दिवसांपासून याच्या लग्नाविषयीच्या बातम्यांची सगळीकडेच धूम उडाली होती. रणबीर-आलियाच्या मेहेंदी,हळद,संगीत सोहळ्याला नटून-थटून उपस्थित राहिलेल्या आप्तेष्टांचे-मित्रपरिवाराचे फोटोज् समोर येत असताना आता समोर आली आहे या दोघांच्या लग्नाची पत्रिका. पत्रिकेचा लूक सगळ्यांच्या पसंतीस उतरला असला तरी एक मोठी चूक निदर्शनास आल्याचं दिसत आहे.

हेही वाचा: प्रियंका चोप्रानं मुलीसंदर्भात घेतला मोठा निर्णय, पहिल्यांदाच एक आई बोलली..

जर रणबीर-आलियाच्या लग्नाची ही पत्रिका निरखून पाहिलात तर त्यावर तारखेचा आणि त्यासंबंधित वाराचा काहीच ताळमेळ साधताना दिसत नाही. रणबीर-आलियाच्या लग्नाच्या पत्रिकेवर लग्नाची तारिख १४ एप्रिल २०२२ लिहिली आहे पण वार मात्र चुकीचा लिहीला गेलाय. तारखेप्रमाणे वार असायला हवा होता गुरुवार पण त्याजागी चुकून शुक्रवार लिहिलं गेलंय. आता नशीब,छपाई करणाऱ्यांनी तारखेत घोळ घातला नाही.

सूत्रांच्या माहितीनुसार १३ एप्रिल २०२२ रोजी ऋषी कपूर यांच्या स्मरणार्थ एक पूजा आयोजित करण्यात आली होती. त्यांनतर मेहेंदी,संगीत,हळदीचे सोहळे पार पाडले. रणबीरच्या काकांच्या मुली करिना,करिष्मा कपूर तसंच रणबीरची सख्खी बहीण रिद्धिमा कपूरनं या सोहळ्याचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

हेही वाचा: रणबीर आलियाच्या संगीत सोहळ्यात कपूर कुटुंबाचा खास डान्स परफॉर्मन्स

रणबीरच्या लग्नाच्या निमित्तानं रणबीरचं घर वास्तू,आर.के स्टुडिओ,कृष्ण राज बंगला रोषणाईनं झगमगताना दिसत आहेत. आज दुपारच्या मुहूर्तावर रणबीर आलिया लग्नबंधनात अडकले असून संध्याकाळी आठच्या सुमारास मीडियाच्या कॅमेऱ्यासमोर येऊन ते चाहत्यांच्या शुभेच्छांचाही स्विकार करणार असल्याचं बोललं जात आहे. लग्नांनंतर दोघं पहिल्यांदाच त्यांच्या 'ब्रह्मास्त्र' या अयान मुखर्जी दिग्दर्शित सिनेमात एकत्र दिसणार असल्यानं आता ती देखील उत्सुकता चाहत्यांच्या मनात आहे.

Web Title: Alia Bhatt Ranbir Kapoors Wedding Card Leaked But It Has This Major Error

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top