कपूर कुटुंबाचं रणबीर आलियाला सरप्राईज; डान्स करीत दिल्या लग्नाच्या शुभेच्छा

मेहेंदी है रचनेवाली ते ढोलिडा गाण्यांवर कपूर कुटुंबाला संगीतसोहळ्यासाठी नृत्य दिग्दर्शन करण्याची जबाबदारी राजेंद्र सिंग म्हणजेच बॉलीवूडचे मास्टरजी यांनी उचलली होती.
Choreographer Rajendra Singh with the Kapoor family.
Choreographer Rajendra Singh with the Kapoor family.Google

रणबीर(Ranbir kapoor) आलियाच्या(Alia Bhatt) लग्नात अख्खं कपूर कुंटुंब एकत्र जमलंय,मग धम्माल तर असणारंच नाही. तसंही पंजाबी लग्नात लग्नाचा बार जोरातच उडवतात आणि हे तर धुमधडाक्यासाठी प्रसिद्ध असलेलं कपूर कुटुंब, मग धमाल तर झालीच पाहिजे नाही का. त्यात रणबीरच्या पिढीतलं कपूर कुटुंबातलं त्याचं हे शेवटचं लग्न. मग काय विचारता,कपूर कुटुंब ही संधी सोडणार आहे थोडीच.

Choreographer Rajendra Singh with the Kapoor family.
Ranbir Alia Wedding:विवाहस्थळी पोलिस अन् मीडियात बाचाबाची; काय घडलं नेमकं?

रणबीर-आलियाच्या लग्नात कपूर कुटुंबानं एका खास डान्स परफॉर्मन्स द्यायचं ठरवलंय,अर्थातच हे वधू-वराला स्पेशल सरप्राईज असणार आहे. या डान्सचं ज्यांनी नृत्यदिग्दर्शन केलं आहे त्या राजेंद्र सिंग म्हणजेच बॉलीवूडचे मास्टरजी यांनी स्वतःच याविषयी गौप्यस्फोट केला आहे. राजेंद्र सिंग यांनी रणबीर-आलियाच्या संगीत सोहळ्यासाठी कपूर फॅमिलीचा एका धमाल परफॉर्मन्स दिग्दर्शित केला आहे.

Choreographer Rajendra Singh with the Kapoor family.
Ranbir Alia Wedding: लग्नावरुन शहनाझ गिल,जेठालालचे अतरंगी मीम्स व्हायरल

राजेंद्र सिंग यांनी याविषयी माहिती देताना सांगितलं की, ''मीच या संगीत सोहळ्यातील 'कपूर स्पेशल' डान्स परफॉर्मन्सचं नृत्यदिग्दर्शन केलं आहे. मेहेंदी है रचनेवाली,ढोलीडा,तेनू लेके मे जावांगा आणि क्यूटीपी अशा गाण्यांवर कपूर कुटूंब नाचणार आहे. हे वर-वधूला मोठं सरप्राईज असणार आहे. फक्त कपूर फॅमिली यावर नाचताना दिसणार आहे. आलियाच्या बाजूनं म्हणजे भट्ट कुटुंबाकडून यात कोणीही सहभाग घेतलेला नाही. लग्नाचं वातवरणं खूप आनंददायी आहे. मी कपूर कुटुंबाला २५ वर्षाहून अधिक काळ ओळखतोय. नीतू कपूर यांनी माझ्या संदर्भात जी इन्स्टा स्टोरी शेअर केली होती तेव्हा खूप छान माझ्याविषयी लिहिलं होतं. मी देखील माझ्या कुटुंबाचाच एक भाग त्यांना मानतो,आमच्यात कधीच प्रोफेशनल नातं राहिलं नाही''.

Choreographer Rajendra Singh with the Kapoor family.
Bhool Bhulaiyaa 2 teaser: 'रुह बाबा येतोय'; कार्तिक दिसला हटके अंदाजात

''रणबीर आणि आलिया यांना या परफॉर्मन्सविषयी काहीच माहिती नाही. फार वेळ मी घेतला नाही या परफॉर्मन्सला बसवण्यासाठी. कारण त्यांच्यातले बरेच लोकं स्टार्स आहेत,जे त्यांच्या त्यांच्या कामात बिझी असतात. करिना,करिष्मा,नीतू कपूर आणि बॉलीवूडशी नाही पण त्यांच्या बिझनेसमध्ये व्यस्त असणाऱ्या रीमा जैन-कपूर असे साऱ्याच या गाण्यात दिसतील. रीमा जैन बॉलीवूडच्या नसल्या तरी त्यांच्या अदा पाहण्यासारख्या आहेत. मला हा परफॉर्मन्स बसवायला फक्त चार-पाच दिवस लागले. इतकंच नाही तर १४ एप्रिलला दुपारी १ वाजता लग्न लागणार असल्याचं देखील त्यांनी सांगितलं''.

Choreographer Rajendra Singh with the Kapoor family.
प्रियंका चोप्रानं मुलीसंदर्भात घेतला मोठा निर्णय, पहिल्यांदाच एक आई बोलली..

राजेंद्र सिंग स्वतः लग्नाला हजर राहणार नाहीत असं त्यांनी सांगितलं. कारण रणबीर आलियाच्या लग्नात फक्त घरातले कुटुंबिय तेही अगदी घरचेच असे ३५ जणंच असणार आहेत असे ते म्हणाले. दिवसा हे लग्न होणार आहे. यासोबतच त्यांनी रणबीर-आलियाला शुभेच्छा देताना त्यांच्या करिअरविषयीच्या खूप चांगल्या गोष्टी शेअर केल्या.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com