'शक्तिमान'नंतर आता 'कॅप्टन व्योम'ही नवीन अवतारात येणार !

'शक्तिमान'नंतर आता 'कॅप्टन व्योम'ही प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
Captain Vyom
Captain Vyomesakal

नवी दिल्ली : ९० च्या दशकात दूरदर्शनचे कार्यक्रम पाहून मोठे झालेल्या प्रेक्षकांसाठी आनंदाची बातमी आहे. 'शक्तिमान' मालिकेवर चित्रपट बनवला जात आहे. अभिनेता रणवीर सिंह (Ranveer Singh) हा मुख्य भूमिकेत असू शकतो. मात्र आता या आनंदात आणखीन भर पडणार आहे. ९० च्या दशकात लोकप्रिय असलेल्या मिलिंद सोमणचा कार्यक्रम 'कॅप्टन व्योम' (Captain Vyom) ही आता एक नवीन आधुनिक अवतारात येणार आहे. 'शक्तिमान' मालिकेवर तीन भागांमध्ये चित्रपट येणार असल्याची घोषणा केल्यानंतर आता प्रोडक्शन हाऊस ब्रूईंग थाॅट्स प्रायव्हेड लिमिटेडने घोषणा केली आहे, की कॅप्टन व्योमला रिब्यूट करण्यावर काम करित आहे. (Milind Soman Captain Vyom Set For Reboot Bollywood)

Captain Vyom
जुन्या नोटा आणि नाणी विकणाऱ्यांनो सावधान ! रिझर्व्ह बँकेने दिला इशारा

इतकेच नव्हे भारतीय टीव्हीचे सुपरहिरो कॅरेक्टरला स्क्रिनवर भूमिकेसाठी बाॅलीवूडचे काही सर्वोत्तम अभिनेत्यांचीही चर्चा सुरु आहे. कॅप्टीन व्योम एक वैज्ञानिक मालिका होती. ही मालिका चित्रपट निर्माता केतन मेहता यांनी बनवला होता. मिलिंद सोमण (Milind Soman) यांची मुख्य भूमिका असलेली ही दूरदर्शनवरील मालिका खूपच लोकप्रिय होती.

भारताचा धाडसी कार्यक्रम

केतन मेहता म्हणाले, या प्रकल्पाबाबत मी खूपच उत्सुक आहे. कॅप्टन व्योमला जागतिक प्रेक्षकांसाठी एक इंडियन सुपरहिरो सांगत मेहता म्हणतात त्यांची कंपनी जेव्हा नवीन शतकात आपल्यासाठी नवीन जागा बनवण्या करिता तयारी करित आहे. ही नव्याने काही तरी करण्याची वेळ आहे. मला आशा आहे की हा सुपरहिरो नवीन उंचीवर जाईल आणि नवीन ठिकाणांवर पोहोचेल.

Captain Vyom
PHOTO: सिरीयलमध्ये दरारा निर्माण करणाऱ्या कोमोलिकाचा खऱ्या आयुष्याचा संघर्ष

पुन्हा ९० च्या दशकातील आनंद

कार्यक्रम नवीन प्रेक्षकांसाठी तयार करणाऱ्या या कंपनीचे सहसंस्थापक आणि चित्रपट पत्रकार प्रशांत सिंह म्हणाले, असे काही करणे एक मोठे आव्हान आहे. मात्र आपल्या देशात सायन्स अॅडव्हेंचर बनवण्यासाठी ही चांगली वेळ आहे. याबरोबरच शक्तिमान, कॅप्टन व्योमसारखे, दूरदर्शनचे हिट शोजच्या नवीन अवतारामुळे आपण आपले बालपण ९० च्या दशकाप्रमाणे पुन्हा जगू.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com