Video:थेट पाकिस्तानातून अल्लू अर्जुनच्या 'पुष्पा'साठी प्रेम संदेश

सोशल मीडियावर व्हिडीओ रील शेअर करीत व्यक्त केल्या मनातील भावना
Allu Arjun in 'Pushpa-The Rise"
Allu Arjun in 'Pushpa-The Rise"Google

साऊथ इंडियन सुपरस्टार अल्लू अर्जुनच्या(Allu Arjun) 'पुष्पा-द राइज'(Pushpa-The Rise) या सिनेमानं संपूर्ण जगाला वेड लावलं आहे असं म्हटलं तर चुकीचं ठरू नये. या सिनेमातील गाण्यांपासून ते त्यातील संवादांपर्यंत सगळ्याचे व्हिडीओ रील्स सोशल मीडियावर जो-तो पोस्ट करत सुटला आहे. यामध्ये अगदी सर्वसामान्य चाहत्यांपासून सेलिब्रिटींपर्यंत सर्वांनीच आपली हौस भागवून घेतली आहे म्हणा किंवा 'पुष्पा' सिनेमावरचं प्रेम व्यक्त केलं आहे असं म्हणूया हवं तर. या सिनेमानं १०० कोटी कमावल्याची चर्चाही आता होऊ लागली आहे. रश्मिका मंदाना(Rashmika Mandana) अन् अल्लू अर्जुनचा हा सिनेमा हिंदी भाषे मध्येही प्रदर्शित केल्यामुळे जास्तीत जास्त लोकांपर्यंत तो पोहोचू शकला आणि त्याचाच हा परिणाम.

आता थेट पाकिस्तान आणि अफगाणिस्तानातून अल्लू अर्जुनच्या पुष्पावर प्रेमाचा वर्षाव होताना दिसून आलेला आहे. हा सिनेमा प्रदर्शित झाल्यापासून अनेक क्रिकेटपट्टूंनी देखील यातील संवाद आणि गाण्यावर व्हिडीओ बनवले आहेत. भारतीय प्रेक्षकांनीही क्रिकेटपट्टूंच्या या प्रयत्नांना उत्स्फुर्त दाद दिली आहे. देश-विदेशातील खेळाडूंनीही या सिनेमातील 'श्रीवल्ली' या प्रसिद्ध गाण्याच्या सिग्नेचर स्टेपवर डान्स करून धम्माल केलेली दिसून आली. आता थेट पाकिस्तान अन् अफगाणिस्तानातून 'श्रीवल्ली' गाण्यावर प्रेम लुटवलं जात आहे. तर हे प्रेम दुसर-तिसरं कुणी नाही तर अफगाणिस्तान संघाचा फिरकीपट्टू राशिद खान(Rashid Khan) अन् पाकिस्तानी वेगवान गोलंदाज हारिस रौफ(Haris Rauf) यांनी 'श्रीवल्ली' गाण्यावर ठेका धरला आहे.

याआधी राशिदने 'पुष्पा-द राइज' सिनेमातील संवाद म्हणत एक व्हिडीओ शेअर केला होता. आता त्याने हारिस रौफसोबत 'श्रीवल्ली' गाण्यावर सिग्नेचर स्टेप केली आहे. अल्लू अर्जुननेही या व्हिडीओवर कमेंट करीत टाळ्यांचा इमोजी शेअर केला आहे. सुरेश रैना, हार्दिक पंड्या, डेव्हिड वॉर्नर आणि वेस्ट इंडीजचा ड्वेन ब्राव्हो यांनी ‘श्रीवल्ली’ गाण्यावर डान्स केला होता. याशिवाय बांगलादेश प्रीमियर लीगमध्येही या गाण्याची सिग्नेचर स्टेप पाहायला मिळाली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com