नागाचैतन्यचं अफेअर,समंथाची पोस्ट चर्चेत; म्हणाली,'सगळ्यांच्याच आयुष्यात...' Samantha Ruth Prabhu | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Naga Chaitanya’s affair, Samantha shared such a post

नागाचैतन्यचं अफेअर,समंथाची पोस्ट चर्चेत; म्हणाली,'सगळ्यांच्याच आयुष्यात...'

साऊथ सुपरस्टार समंथा रुथ प्रभू (Samantha Ruth Prabhu) नागा चैतन्यपासून(Naga Chaitanya) विभक्त झाल्यानंतर भलतीच चर्चेत आली आहे. दोघांविषयीच्या बातम्या गेल्या काही दिवसांत सोशल मीडियावर 'टॉक ऑफ द टाऊन' बनल्यात. आता बातमी आहे की समंथाला घटस्फोट दिल्यानंतर नागाचैतन्य पुन्हा प्रेमात पडला आहे. नागा चैतन्यचं नाव एका अभिनेत्रीशी जोडलं जात आहे. आता या बातमीत किती तथ्य आहे हे सांगणं थोडं कठीण आहे. पण नागाचैतन्यच्या अफेअरच्या बातम्यांमध्ये समंथानं एक पोस्ट शेअर केली आहे,जी जोरदार व्हायरल होत आहे. चला पाहूया समंथानं नेमकी काय पोस्ट केली आहे.(Naga Chaitanya’s affair, Samantha shared such a post)

Samantha ruth prabhu instagram story image

Samantha ruth prabhu instagram story image

समंथा रुथ प्रभुने इन्स्टाग्राम स्टोरीत एक पोस्ट शेअर केली आहे. समंथानं या पोस्टमध्ये स्वतःविषयी किंवा नागाचैतन्य विषयी काही लिहिलेलं नाही पण तिनं रणवीर सिंगचं एक वक्तव्य शेअर केलेलं आहे. या पोस्टला वाचल्यावर वाटतं की रणवीर जे बोलला आहे त्याच्याशी समंथाचा कुठे न कुठे संबंध आहे. या पोस्टमध्ये लिहिलंय,''कष्ट सगळ्यांनाच आयुष्यात करावे लागतात,त्यामुळे मला आयुष्यात मजा-मस्ती,विनोद करणं आवडतं,मला आयुष्य हलक-फुलकं ठेवायला आवडतं''. ही पोस्ट वाचल्यावर वाटतंय कुठएतरी समंथा नागाचैतन्यच्या अफेअरच्या बातम्यांचा आपल्यावर काही परिणाम झालेला नाही हे दाखवायचा जणू प्रयत्न करतेय.

हेही वाचा: Kangana-Javed Defamation Case: 4 जुलैला कंगना कोर्टात हजर राहिली नाही तर...

काही दिवसांपूर्वी समंथा रुथ प्रभू विषयी बातमी होती की तिचं कोणासोबत तरी अफेअर सुरू आहे. तर आता तिचा पूर्वाश्रमीचा पती नागाचैतन्यचं नाव देखील अभिनेत्री शोभिता धुलिपाला सोबत जोडलं जातंय. हे दोघेही गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहेत. दोघं एकमेकांना डेट करतायत असं देखील म्हटलं जात आहे. नागा चैतन्यच्या नवीन घरात अभिनेत्री शोभिता धुलिपाला पाहिल्यानंतर दोघांमध्ये काहीतरी सुरू आहे या बातमीनं जोर पकडला. पण अद्याप याविषयी दोघांनीही मौन साधलं आहे.

Web Title: Amidst The News Of Naga Chaitanyas Affair Samantha Shared Such A Post Wrote Trouble Everyones

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..