अमिताभ बच्चन यांची नात नव्या नवेलीचे मनोरंजन क्षेत्रात पदार्पण Navya Naveli | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Amitabh Bachchan’s granddaughter Navya Naveli makes her screen debut,

अमिताभ बच्चन यांची नात नव्या नवेलीचे मनोरंजन क्षेत्रात पदार्पण

नव्या नवेली(Navya Naveli) बॉलीवूडमधली(bollywood) सर्वात फेमस स्टार किड्सपैकी एक आहे. नव्या भलेही लाइमलाइटपासून दूर आहे पण सोशल मीडियावर मात्र ती खूप सक्रिय पहायला मिळते. तिचा चाहता वर्ग देखील सोशल मीडियावर मोठ्या संख्येने आहे. नव्याच्या कोणत्याही कामाला तिचे चाहते पाठिंबा देतानाही दिसतात. आता तिचे चाहते खूश होणार आहेते जेव्हा ते ऐकतील की त्यांची लाडकी नव्या नवेली मनोरंजन क्षेत्रात पदार्पण करत आहे.(Amitabh Bachchan’s granddaughter Navya Naveli makes her screen debut)

लवकरच नव्या एका जाहिरातीत दिसणार आहे. तिने सोशल मीडियावर या जाहिरातीची एक झलक शेअर केली आहे. या व्हिडीओत नव्या नवेली नंदा एका लॅपटॉपसमोर बसलेली दिसत आहे. तिच्या मागून कोणतरी बोलत असल्याचा आवाज येत आहे. एक अनोळखी महिला नव्याला विचारतेय,''तू युनायटेड नेशन्सची प्रतिनिधी आहेस का? तू खूप तरूण आहेस. तुझ्याकडे तर अनुभव नाहीय कसला''.

हेही वाचा: खूप दिवसांनी कतरिना एअरपोर्टवर, अभिनेत्रीला पाहताच 'बेबी बंप' ची चर्चा सुरु

नव्याची ही जाहिरात लोरिय़ल पॅरिस ब्रॅंडची आहे. या ब्रॅंडला तिची मामी ऐश्वर्या राय-बच्चन काही वर्षांपूर्वी प्रमोट करत होती. नव्याचा हा व्हिडीओ समोर आल्यानंतर तिचे चाहते मात्र भलतेच खूश आहेत आणि उत्साहीत देखील झाले आहेत. तर नव्याच्या फिल्म इंडस्ट्रीतल्या मित्र-मैत्रिणींनी देखील तिच्या व्हिडीओवर आनंद व्यक्त केला आहे. नव्याच्या मैत्रिणी सुहाना खान,शनाया कपूर, आदर जैन आणि आई श्वेता बच्चनने या पोस्टवर कमेंट केल्या आहेत.

हेही वाचा: ललित मोदीसोबतच्या नात्यावर सुश्मिता सेन स्पष्टच म्हणाली,'ना लग्न,ना Ring..'

आई श्वेता बच्चनने लिहिलं आहे,'तुझी पात्रता यापेक्षा खूप काही मोठं मिळवण्याची आहे बेटा'. सुहानाने लिहिलं आहे,'ओ माय गॉड,वॉव्..',तर शनायाने लिहिलं आहे,'Navvvv!!!खूपचं सुंदर'. अनन्या पांडेने कमेंट केलीय की,'खूप प्रेम, मी तुझ्यासाठी खूप खूश आहे'. प्रसिद्ध फोटोग्राफर रोहन श्रेष्ठने लिहिलं आहे,'तु कांसला जात आहेस का?' आदर जैनने देखील हार्ट इमोजी पोस्ट करत नव्याचे कौतूक केले आहे. अथिया शेट्टी आणि रिद्धिमा कपूर साहनीने देखील हार्ट इमोजी पोस्ट करत नव्यासाठी आनंद व्यक्त केला आहे.

हेही वाचा: तापसी पन्नूविषयी असं काय ऐकलं की दिवंगत Rishi Kapoor यांना बसला होता धक्का

नव्या नवेली अमिताभ बच्चन(Amitabh Bachchan) आणि जया बच्चन यांची नात आहे. श्वेता बच्चन आणि व्यावसायिक निखिल नंदाची मुलगी आहे. नव्या मोठ्या पडद्यापासून लांब राहत लोकांच्या भल्यासाठी NGO चालवते. तिचा एक भाऊ आहे,ज्याचं नाव अगस्त्य नंदा आहे. अगस्त्य लवकरच सुहाना खान आणि खुशी कपूर सोबत 'द आर्चीज' सिनेमाच्या माध्यमातून बॉलीवूडमध्ये पदार्पण करत आहे. नेटफ्लिक्सवर हा सिनेमा रिलीज केला जाणार आहे. या सिनेमाला झोया अख्तरने दिग्दर्शित केले आहे.

Web Title: Amitabh Bachchans Granddaughter Navya Naveli Makes Her Screen Debutamitabh Bachchans Granddaughter Navya Naveli Makes Her Screen

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..