लॉकडाऊनमध्येही अनिल कपूरची उत्कृष्ठ कामगिरी; नामांकित भारतीय सेलिब्रिटींच्या यादीत मिळवले स्थान...

संतोष भिंगार्डे
Monday, 20 July 2020

बदलत्या काळाबरोबर स्वतःमध्ये बदल करणे या कौशल्यामुळे त्याचे नेहमीच कौतुक होत आले आहे.  बरीच वर्षे इंडस्ट्रीमध्ये असलेल्या अनिल कपूरने यावर्षी पहिल्या दहा नामांकित भारतीय सेलिब्रिटींच्या यादीत स्थान मिळविले आहे.

मुंबई : सुपरस्टार अनिल कपूर चित्रपटांतील आपल्या अभिनयाने सर्वच वयोगटातील लोकांच्या मनावर राज्य करत आहे. 'मलंग'मधील त्याची गंभीर भूमिका असो किंवा 'टोटल धमाल' मधील त्यांचा विनोदी अवतार असो किंवा 'एक लडकी को देख तो ऐसा लगा' यामधील हृदयस्पर्शी अभिनय असो, त्याला मोठ्या स्क्रीनवर पाहणे नेहमीच प्रेक्षकांसाठी एक पर्वणी असते.

उद्यापासून कल्याण कृषी उत्पन्न बाजार समिती सुरु; व्यापाऱ्यांसह नागरिकांना दिलासा

बदलत्या काळाबरोबर स्वतःमध्ये बदल करणे या कौशल्यामुळे त्याचे नेहमीच कौतुक होत आले आहे.  बरीच वर्षे इंडस्ट्रीमध्ये असलेल्या अनिल कपूरने यावर्षी पहिल्या दहा नामांकित भारतीय सेलिब्रिटींच्या यादीत स्थान मिळविले आहे. एका मान्यवर संस्थेने 2020 मध्ये नुकत्याच दिलेल्या अहवालात असे म्हटले आहे की कोव्हिड संकटाच्या काळात सेलिब्रिटी-मान्यताप्राप्त जाहिरातींच्या प्रमाणात वाढ झाली आहे. बॉलीवूडच्या
अनेक बड्या सेलिब्रिटीजनी कोरोनाच्या काळात जाहिराती केल्या. त्या यादीमध्ये अनिल कपूर सहाव्या क्रमांकावर आहेत. हा अभिनेता अशा कलाकारांपैकी एक आहे जो नेहमी बदलत्या काळाबरोबर चालतो. 

कांदिवली येथे रेल्वेची ट्रकला धडक; सुदैवाने मोठा अपघात टळला...

खरं तर तो खर्‍या अर्थाने मनोरंजन करणारा आहे, कारण आजच्या युगातही अनिल कपूर आपली कलाकुसर सुधारत आणि बदलत्या शैलींप्रमाणे नवीन प्रयोग करताना आपल्याला दिसतो. आजच्या काळाशी जुळवून घेताना, आजची फॅशन जपताना स्वतःला तंदुरुस्त ठेवण्यातही तो अभिनयाप्रमाणेच आघाडीवर आहे. यावर्षी फेब्रुवारी महिन्यात आलेल्या त्याच्या 'मलंग'मधील अभिनयाचे अजूनही कौतुक होत आहे. आता अनिल कपूर नेटफ्लिक्सवरील आणखी एका चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 'एके व्हर्सेस एके' असे या सिनेमाचे नाव आहे. हा सिनेमा एक रिव्हेंज ड्रामा असेल.
---
संपादन : ऋषिराज तायडे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Anil Kapoor gets selected in top 10 celebraty who works in lockdown