
'जगातली सगळ्यात अनोखी हेअर स्टाईल पाहिलीत का?'अनुपम खेर यांचा Video व्हायरल
दिग्गज आणि लोकप्रिय अभिनेत्यांपैकी एक नाव म्हणजे अनुपम खेर(Anupam Kher). खेर आपल्या वैविध्यपूर्ण भूमिकांनी कायमच चाहत्यांचे मन मोहून घेत असतात. भूमिका विनोदी असो, की गंभीर, अनुपम कायमच आपल्या आगळ्या शैलीत ती खुमासदारपणे रंगवतात. अनुपम खेर सोशल मीडियावरही सतत सक्रीय असतात. रंजक पोस्ट्स, मोटिव्हेशनल कोट्स आणि मजेदार व्हीडियोजच्या माध्यमातून ते चाहत्यांशी संवाद साधत असतात.
हेही वाचा: पंचायत 2: 'मंजू देवी-प्रधानजी' 40 वर्षांपूर्वीचा फोटो व्हायरल झाला अन्...
काही काळापूर्वीच लॉस एंजेलिसला पोचलेल्या खेर यांनी स्वदेशी मायक्रो-ब्लॉगिंग मंच, 'कू'वर एक अनोखा व्हीडिओ शेअर केला आहे. हा एका अशा हेयरस्टाइलवर आधारित आहे, जी करण्याचा विचारही कधी कुणाच्या मनात आला नसेल.
अनुपम खेर यांनी पोस्टमध्ये लिहिलं आहे की,''एलएमध्ये झालेलं एक एनकाउंटर: एका सुपर मार्केटमध्ये माझी भेट @CocktailsByHawk (सईद)सोबत झाली. तो खूपच दयाळू आणि मदत करायला तत्पर वाटला. सईद आणि मी त्याच्या अनोख्या हेअरस्टाइलबद्दल बोललो. आधी मला वाटलं, की ही एक विग आहे. मात्र नंतर त्याने मला सांगितलं, की हे खरोखरचे केस आहेत. कमाल आहे ना दोस्तांनो, खरोखर ‘कुछ भी हो सकता है!’'
हेही वाचा: Abhay Deol: दिग्दर्शकानं पसरवली होती घाणेरडी अफवा; अभिनेत्याचा मोठा खुलासा
व्हीडियोमध्ये आपण पाहू शकतो, की अनुपम खेर सईद नावाच्या या अनोख्या हेयरस्टाइल असलेल्या सईदशी गप्पा मारत आहेत. सईहीद अनुपम यांना उत्साहात उत्तरं देत आहे. अनुपम खेर सांगत आहेत की,'' सईद ईराणचे आहेत. सईदची हेअरस्टाइल अशी आहे, की मी स्वप्नातही तिची कल्पना करू शकत नाही. सईदला ही हेयरस्टाइल सेट करण्यासाठी एक किंवा दोन नाही, तर तब्बल 12 वर्षांचा काळ लागला. एवढंच नाही, तर रोज केस सेट करण्यासाठी त्यांना 45 मिनटांचा वेळ लागतो''.
हेही वाचा: 'अकेलेपन का मजा अलग है..', शमा सिंकदरनं ओलांडल्या मर्यादा,हॉट फोटोची चर्चा
अनुपम खेर म्हणाले की ''जसं, माझ्या डोक्यावर आणि व्हीडिओ बनवणाऱ्याच्या डोक्यावरही एकही केस नाही, मला आशा आहे, की एक ना एक दिवस मी नक्कीच अशी हेअरस्टाइल ठेवू शकेन''.
Web Title: Anupam Kher Share Video From Supermarketunique Hairstyle Videoencounters In
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..