Anurag Kashyap : 'नवाझुद्दीन अन् विकी कौशल सोबत चित्रपट नाही! ते आता....' अनुरागनं काय दिलं उत्तर?

हे पाहा त्याचं काय आहे की, मी कोणत्याही मोठ्या कलाकारासोबत काम करण्यास घाबरत नाही.
Anurag Kashyap Bollywood Director comment on Nawazuddin Siddiqui Vicky
Anurag Kashyap Bollywood Director comment on Nawazuddin Siddiqui Vicky esakal

Anurag Kashyap Bollywood Director comment on Nawazuddin Siddiqui Vicky : अनुराग कश्यप हा बॉलीवूडचा प्रसिद्ध दिग्दर्शक आहे. त्याच्या चित्रपटांचा प्रेक्षकवर्गही मोठा आहे. त्याच्या चित्रपटांना मिळणारा मिळालेला प्रतिसादही तुफान आहे. त्यानं कित्येक नवोदित कलाकार बॉलीवूडपुढे आणले आहेत. यात नवाझुद्दीन सिद्धिकी आणि विक्की कौशल यांच्या नावाचा समावेश आहे.

अनुरागनं एका मुलाखतीमध्ये यापुढील काळामध्ये नवाझुद्दीन आणि विक्की कौशलसोबत काम करताना विचार करावा लागेल. असे म्हटले आहे. त्यानं त्यामागील कारणही सांगितले आहे. ती मुलाखत सोशल मीडियावर नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेताना दिसत आहे.

Also Read - Success Story : अन् त्याने शिक्षणासाठी डोंगरावर मात केली सचिनचा संघर्ष वाचायलाच हवा

Anurag Kashyap Bollywood Director comment on Nawazuddin Siddiqui Vicky
Anurag Kashyap Bollywood Director comment on Nawazuddin Siddiqui Vicky esakal

हे पाहा त्याचं काय आहे की, मी कोणत्याही मोठ्या कलाकारासोबत काम करण्यास घाबरत नाही. पण आजच्या घडीची गोष्ट पाहता मला नवाझुद्दीन आणि विक्की कौशल यांना त्यांची फी देणं हे शक्य नाही. ते मोठे कलाकार झाले आहेत. त्यांचा स्टारडम मोठा आहे. चाहतावर्ग लाखोत आहे. माझ्या चित्रपटांचे बजेट इतके कमी असते की, त्यातून मला मोठे नुकसान होत नाही. पण त्या चित्रपटांमध्ये काम करणाऱ्या कलाकारांची निराशा होते.

अनुरागनं त्या मुलाखतीमध्ये अनेक गोष्टींविषयी स्पष्टपणे खुलासा केला आहे. आता मी रमन राघव सारखी फिल्म ही विक्की सोबत आता बनवू शकतो का, तर त्याचे उत्तर नाही असे आहे. कारण त्याचे बजेट आणि विक्कीचे बजेट यात जमीन अस्मानाचा फरक आहे. हे आपण लक्षात घेण्याची गरज आहे. विक्कीची मार्केट व्हॅल्यू ही खूपच जास्त आहे. याचा विचार करायला हवा.

Anurag Kashyap Bollywood Director comment on Nawazuddin Siddiqui Vicky
Jawan Shah Rukh Khan : 'हे माझं शेवटचं टक्कल, यानंतर मी पुन्हा कधीही....!' किंग खाननं सांगून टाकलं

जेव्हा अनुरागला असं विचारण्यात आलं होतं की, जर विक्कीनं फी कमी केली तर तुम्ही त्याला चित्रपटात घेणार नाही का, त्यावेळी तो म्हणाला की, हे पाहा आपण दोन्ही बाजूंनी विचार करायला हवा. विक्की वाटल्यास माझ्याकडे फ्री मध्ये देखील काम करेल. पण मला ते योग्य वाटणार नाही. त्या उपकारांचे माझ्यावर नेहमीच ओझे असेल. आणि मला ते ऋण कसे फेडायचे हा प्रश्न कायम असेल.

Anurag Kashyap Bollywood Director comment on Nawazuddin Siddiqui Vicky
Jawan Advance Booking : शाहरुख आला, विषयच संपला! किंग खानच्या 'जवान'नं 24 तासांत तोडलं 'पठाण'चं रेकॉर्ड

त्या कलाकारांनी पैशांच्या अटीवरुन आणि काही तडजोडींवरुन माझ्यासोबत काम करण्यास तयारी दर्शवली तरी आता मला ते आवडणार नाही. ते माझ्यासाठी कायम गिल्टी असेल. ही गोष्ट मला पटणारी नाही. तुम्हाला माहिती नसेल पण विक्कीनं पहिल्यांदा 'ऑलमोस्ट प्यार' या चित्रपटात माझ्यासाठी काम केले होते. त्याचे पैसेही त्यानं घेतले नाही. त्यानेच मला डेट दिली होती. त्यानुसार आम्ही शुटींग पूर्ण केली होती.

Anurag Kashyap Bollywood Director comment on Nawazuddin Siddiqui Vicky
Scam 2003 The Telgi Story Review : शेवटी तेलगीनं सगळ्यांची पोलखोल केली, पैशांची हाव स्वस्थ बसू देईना!

जेव्हा मी रमन राघव २.० ची गोष्ट नवाझुद्दीन समोर ठेवली तेव्हा त्यानं मला म्हटले होते की, तू पैशांचा विचार करु नकोस. तसेच विकीनं देखील एकही रुपया न घेता माझ्याकडे काम करण्याची तयारी दर्शवली होती. ही लोकं तयार होतात त्याला कारण मी त्यांच्यासोबत यापूर्वी केलेलं काम. पण आता ते शक्य नाही. बऱ्याच गोष्टी वेळेनुसार बदलत असतात. आणि त्यांनी माझ्याप्रती जी भावना व्यक्त केली त्याचा मला गैरफायदा घ्यायचा नाही. असेही अनुरागनं यावेळी सांगितले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com