अनुष्का शर्माची उत्कृष्ठ कामगिरी; जागतिक सामर्थ्यवान महिला निर्मात्यांच्या यादीत समावेश...

संतोष भिंगार्डे
Thursday, 16 July 2020

जगभरातील प्रेक्षकांसाठी नेहमीच्या भाऊगर्दीपेक्षा वेगळ्या कलाकृती सादर करणाऱ्या नताली पोर्टमन, जेनिफर अॅनिस्टन आणि रीस विदरस्पून यांच्यासारख्या जागतिक स्तरावरच्या सामर्थ्यवान महिला निर्मात्यांच्या यादीत आता अनुष्का शर्माचाही समावेश झाला आहे.

मुंबई : अभिनेत्री अनुष्का शर्मा अभिनयासोबतच आता निर्मिती क्षेत्रातही उतरली आहे. तिची निर्मिती असलेली "पाताल लोक" ही वेबसिरीज प्रचंड गाजली आहे. आता अभिनेत्री व निर्माती नताली पोर्टमन, अमेरिकन अभिनेत्री, निर्माती आणि उद्योजिका जेनिफर अॅनिस्टन आणि अमेरिकन अभिनेत्री, निर्माती रीस विदरस्पून यांच्यासारख्या सामर्थ्यवान महिला निर्मात्यांच्या युगात आपल्या निर्मिती प्रकल्पांची चर्चा जागतिक पातळीवर होत आहे हे पाहून अनुष्का शर्मा खूप खुश आहे.

मुंबईचे एक पाऊल पुढे; गतवर्षीच्या तुलनेत बारावीच्या निकालात 'अशी' झाली वाढ...

जगभरातील प्रेक्षकांसाठी नेहमीच्या भाऊगर्दीपेक्षा वेगळ्या कलाकृती सादर करणाऱ्या नताली पोर्टमन, जेनिफर अॅनिस्टन आणि रीस विदरस्पून यांच्यासारख्या जागतिक स्तरावरच्या सामर्थ्यवान महिला निर्मात्यांच्या यादीत आता अनुष्का शर्माचाही समावेश झाला आहे. अनुष्काने लागोपाठ निर्मिती केलेल्या पाताल लोक आणि बुलबुल या वेबसिरीजची त्यांच्या उत्कृष्ट आशयामुळे जगभरात चर्चा सुरू आहे. या दोन्ही वेबसिरीजनी जगभरातल्या प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. काही वर्षांपूर्वी आपला भाऊ कर्णेश शर्मा याच्यासोबत तिने क्लीन स्लेट फिल्म्झची स्थापना केली होती.

शुल्कासाठी खारघरमधील शाळेचा असाही प्रताप; ऑनलाईन शिक्षणच केले बंद...

अनुष्का म्हणते, “अगदी सुरुवातीपासूनच मला हे माहिती होतं की आम्हाला अत्यंत अनोख्या आणि वेगळ्या कथा सांगायच्या आहेत, ज्यांच्यामध्ये एक ताजा दृष्टिकोन असेल आणि ज्यांची कल्पना असंख्य लोकांच्या मनांना स्पर्श करून जाणारी असेल. बड्या जागतिक स्ट्रीमिंग कंपन्या तुम्हाला तेवढे मोठे व्यासपीठ मिळवून देतात. ते तुम्हाला जगभरातल्या फार मोठ्या प्रेक्षक संख्येपर्यंत पोहोचवतात.'' 

राज्यातील कोरोना चाचण्यांबाबत धक्कादायक माहिती; 10 लाख लोकसंख्येमागे होतात केवळ 'इतक्या' चाचण्या...

''आपण भारतात बसून कोलंबिया, स्पेन आणि इस्राइलमध्ये घडणारे शोज पाहतो आहोत, ते आपल्याला आवडत आहेत. ते आपल्याशी नातेही जोडत आहेत. आपल्या भारतातदेखील विविध संस्कृती आणि अनेक वैविध्यपू्र्ण कथा आहेत. त्या कथादेखील जगभरतील प्रेक्षकांपर्यंत पोहोचल्या पाहिजेत. आपल्या येथील कथा जगाच्या कोणत्याही कोपऱ्यात पोहोचल्या पाहिजेत.'' त्यामुळे आता पाताल लोक आणि बुलबुल या वेब सिरीजची त्यांच्या उत्कृष्ट आशयामुळे अनुष्का शर्मा आता पुढे काय नवीन घेऊन येतेय याची सगळ्यांनाच उत्सुकता लागली आहे.   
----
संपादन : ऋषिराज तायडे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: anushka sharma listed in most powerfull women in world