'राजकारणी लोक वाईटच...', राजकारणावर अवधूत गुप्तेची 'खुपते' प्रतिक्रिया Avdhoot Gupte | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Avdhoot Gupte speaks on politics, 'Jeevacha Raan In Matdan'- Viju Mane Talk Show

'राजकारणी लोक वाईटच...', राजकारणावर अवधूत गुप्तेची 'खुपते' प्रतिक्रिया

अवधूत गुप्ते(Avdhoot Gupte) हे नाव शिवसेना(Shivsena) पक्षाशी तसं जवळून जोडलं गेलेलं. अवधूत आणि शिवसेना हे समीकरण जुळून आलं ते शिवसेना गीतामुळे. निवडणुकीच्या निमित्तानं संगीतकार-गायक-दिग्दर्शक-निर्माता म्हणून ओळख असलेल्या अवधूत गुप्तेकडं शिवसेनेनं मुख्य जबाबदारी सोपवली होती ती, शिवसेना गीताची. शिवसेना गीत हे शिवसेनेचं राष्ट्रगीत हवं अशी बाळासाहेबांची इच्छा होती. त्यामुळे अर्थातच तेव्हा अवधूतवर याचं प्रचंड दडपण होतं. पण त्यानं जे काम केलं,जे गाणं बनवलं त्यानं शिवसेनेच्या इतिहासात नाव नोंदवलं असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही.(Avdhoot Gupte speaks on politics, 'Jeevacha Raan In Matdan'- Viju Mane Talk Show)

हेही वाचा: अमिताभ बच्चन यांची नात नव्या नवेलीचे मनोरंजन क्षेत्रात पदार्पण

आजही शिवसेना गीत लागलं की अंगात दुप्पट बळ येतं,रक्त सळसळतं. त्यावेळी या गाण्याच्या निर्मितीच्या निमित्तानं शिवसेना नेते,कार्यकर्ते,उद्धव ठाकरे अगदी बाळासाहेबांना जवळून अनुभवण्याची संधी अवधूतला मिळाली. त्यामुळे तसा तो शिवसेना पक्षाशी भावनिक रित्याही त्याच्या कामाच्या निमित्तानं जोडला गेला होता. आज विजू मानेच्या जीवाचं रान इन मतदान या मुलाखतीच्या कार्यक्रमात म्हणूनच अवधूतला जेव्हा प्रश्न विचारला गेला की शिवसेनेतील फूट,सध्याचं राजकीय बिघडलेलं वातावरण तूला खुपतं का तेव्हा अवधूत प्रतिक्रिया देताना काही वर्ष मागे गेला. आणि भावूक होऊन त्यानं काही किस्से शेअर केले. आणि नेमकं त्याला काय खुपते हे देखील एका वाक्यात मांडलं.

हेही वाचा: तापसी पन्नूविषयी असं काय ऐकलं की दिवंगत Rishi Kapoor यांना बसला होता धक्का

दिग्दर्शक विजू मानेनं आपल्या शो च्या सूत्रसंचालकाच्या भूमिकेत अवधूतला सध्याच्या राजकारणातलं तुला काय खुपतं असं विचारल्यावर तो म्हणाला,''राजकीय नेते असं वागतात म्हणून ते वाईटच असतात असे नाही. त्यामुळे त्यांच्याविषयी चुकीचा समज करुन घेणे मला अधिक खुपते''. आता हे असं उत्तर त्यानं दिल्यानं नेमकं कोणाविषयी चुकीचा सुर लावलेला अवधूतला खुपतोय हे स्पष्ट होत नाही .

कारण सध्या पाहिलं तर आपल्याच घरात फुटीचं राजकारण खेळल्यामुळे नवनिर्वाचित मुख्यमंत्री बनलेले एकनाथ शिंदे यांनाही काहीजण वाईट ठरवतायत,तर शिवसेनेतील नेत्यांची फरफट होत असताना आपल्याच लोकांकडे दूर्लक्ष करत कॉंग्रेस-राष्ट्रवादीशी हातमिळवणी करणारे उद्धव ठाकरे यांच्या विरोधात देखील सूर उमटत आहे. मग नेमकं कोणाला वाईट ठरवल्यावर अवधूतला अधिक खुपलंय यावर आता चर्चा रंगताना दिसतेय.

हेही वाचा: ललित मोदीसोबतच्या नात्यावर सुश्मिता सेन स्पष्टच म्हणाली,'ना लग्न,ना Ring..'

याच मुलाखतीत अवधूतनं शिवसेना गीताच्या निर्मितीवेळचे काही किस्से शेअर केले. तो म्हणाला, ''जेव्हा बाळासाहेब म्हणाले होते की हे शिवसेना गीत,शिवसेनेचं राष्ट्रगीत असणार,ते बदलणार नाही तेव्हा आपल्यावर खूप दडपण आल्याचं अवधूत म्हणाला. त्यावेळी घरी जाऊन दरदरुन घाम फुटेलेल्या अवस्थेत १५ मिनिटात लिहिलेलं गाणं आणि त्यानंतर त्या शब्दांना दिलेली चाल,यावर बाळासाहेबांची प्रतिक्रिया,त्यांचं मार्गदर्शन या सगळ्या गोष्टींनी गाण्याला एके वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवलं'' असं देखील त्यानं सांगितलं. तसंच, एकदा राष्ट्रवादीच्या कार्यक्रमात तिथे आलेल्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी शिवसेना गीत गाण्याचा हट्ट आपल्याकडे धरला तेव्हा आपल्याला धक्का बसल्याचं अवधूत म्हणाला.

Web Title: Avdhoot Gupte Speaks On Politics Jeevacha Raan In Matdan Viju Mane Talk

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Marathi Movies