
Baba Ramdev: योगगुरू म्हणून ओळखले जाणारे बाबा रामदेव त्यांच्या वक्तव्यामुळे नेहमीच चर्चेत असतात. बॉलीवुडमधील प्रसिद्ध अभिनेता सलमान खानवर केलेल्या टीकेमुळे आता ते परत एकदा चर्चेत आले आहे. मुरादाबाद येथे नुकत्याच पार पडलेल्या आर्यवीर महासंमेलनाच्या व्यासपीठावरून बाबा रामदेव यांनी लोकांना अंमली पदार्थांचे सेवन न करण्याचे आवाहन केले. यावेळी त्यांनी बॉलीवूड स्टार्सवर जोरदार टीका केली.
सलमान खान या बड्या कलाकाराचं नाव घेत यावेळी त्यांनी बॉलीवूडवर टीकास्त्र सोडलं. त्यांच्या वक्तव्यानंतर आता सलमानच्या फॅन्समध्ये सलमान ड्रग्ज घेतो की काय? यावर मोठ्या प्रमाणात चर्चा चाललेली दिसते.
बाबा रामदेव यांच्या वक्तव्यानंतर बॉलीवूडमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. 'सलमान खान ड्रग्ज घेतो, आमिरबद्दल मला माहित नाही, आणि बॉलीवूडच्या अभिनेत्रींबाबत तर देवालाचा ठाऊक.' अशा परखड शब्दांत त्यांनी बॉलीवूडवर टीकास्त्र सोडलं आहे. पुढे ते म्हणतात, 'शाहरूखचा मुलगा ड्रग्ज घेताना पकडला गेला होता, आणि त्यासाठी त्याला तुरूंगातही जावं लागलं होतं. सलमान तर ड्रग्ज घेतोच आणि आमिरचं सांगता येत नाही. खरं तर संपूर्ण बॉलीवूड ड्रग्जच्या विळख्यात आहे.'
अंमली पदार्थांवर टीका करता करता रामदेव यांनी संपूर्ण बॉलीवूडवर टीकास्त्र सोडलं
आर्यवीर महासंमेलनात सहभागी होण्यासाठी उत्तर प्रदेशचे नेते योगी आदित्यनाथही पोहोचले होते. व्यसनमुक्ती आणि जनजागृती करता करता या महासंमेलनात बाबा रामदेव थेट बॉलीवूडच्या विषयावर पोहोचले. सलमान शाहरूखचे उदाहरण देत त्यांनी फिल्म इंडस्ट्रीवर ड्रग्ज सेवनाचा आरोप केला. सध्या ड्रग्ज प्रकरणामध्ये सतत नवनवीन नावे समोर येत असतात. अजूनही अनेक बड्या कलाकारांची नावं ड्रग्ज प्रकरणात अडकली आहेत.
विडी, सिगारेट, दारू सोडण्याचे आवाहन केले
बाबा रामदेव यांनी सांगितले की, संपूर्ण भारत भूमी ही ऋषीमुनींची भूमी आहे. तेव्हा सगळ्यांनी अंमली पदार्थांच्या दूर राहायला हवं. यामुळे अनेकांचे आयुष्य उद्ध्वस्त होत आहे. म्हणून त्यांनी सिगारेट, दारू सोडण्याचे आवाहन केले. बाबा रामदेव यांच्या म्हणण्यानुसार, यानंतर शेकडो साधूंनी त्यांची चिलीम रामदेव बाबा यांच्याकडे सुपूर्द केल्या होत्या आणि म्हटले होते की, बाबाजी आजपासून आम्ही चिलीम ओढणार नाही.’
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.