Sonali Chakraborty : 'बंधन' फेम अभिनेत्री सोनाली चक्रवती यांचे निधन

प्रसिद्ध अभिनेत्री सोनाली चक्रवर्ती यांचे निधन झाल्याची बातमी समोर आली आहे.
Sonali Chakraborty
Sonali Chakrabortyesakal

Bengali Tv Actress Death Sonali Chakraborty: टीव्ही मनोरंजन विश्वाला धक्का देणारी एक घटना घडलीय. प्रसिद्ध अभिनेत्री सोनाली चक्रवर्ती यांचे निधन झाल्याची बातमी समोर आली आहे. आपल्या अभिनयानं प्रेक्षकांचे निखळ मनोरंजन करणाऱ्या या अभिनेत्रीचा चाहतावर्ग मोठा होता. वेगवेगळ्या भाषेतील चित्रपटांमध्ये काम करत त्यांनी आपल्या नावाची वेगळी ओळख निर्माण केली होती.

सोनाली यांचे काम प्रामुख्यानं बंगाली टीव्ही विश्वात होते. आज सकाळ कोलकाता रुग्णालयात त्यांची प्राणज्योत मालवल्याची बातमी सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सोनाली या गेल्या काही दिवसांपासून आजारी होत्या. त्यांच्यावर रुग्णालयात उपचारही सुरु होते. त्यांच्या निधनाचे वृत्त ऐकताच अनेकांनी शोक व्यक्त केला आहे. त्यांना आदरांजली वाहिली आहे.

चित्रपट, मालिकांमधून आपल्या प्रवासाला सुरुवात करणाऱ्या सोनाली या पहिल्यांदा 2002 मध्ये आलेल्या हार जीतमध्ये दिसल्या होत्या. या चित्रपटातील त्यांच्या भूमिकेचे कौतूक झाले होते. प्रेक्षकांनी त्यांना ड़ोक्यावर घेतले होते. याशिवाय बंधन नावाच्या चित्रपटामध्ये देखील त्यांची भूमिका प्रेभकांच्या नजरेत भरली होती. सततच्या आजारपणामुळे त्यांनी मनोरंजन विश्वापासून काही काळ ब्रेक घेतला होता.

Sonali Chakraborty
Swara Bhasker: 'याच्यापेक्षा मोठं...' ट्रोलर्सला उत्तर देताना स्वरा भलतचं बोलली

सोनाली यांना काही दिवसांपासून मालिकांमध्ये काम करणे अवघड झाले होते. ऑगस्टमध्ये त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांचे पती शंकर चक्रवर्ती यांनी सांगितले की, सोनाली यांच्या लिव्हरम्ध्ये बिघाड झाला आहे. त्यामुळे त्यांची प्रकृती नाजूक स्थितीत आहे. काही दिवसांपासून त्या रुग्णालयात उपचार घेत होत्या.

Sonali Chakraborty
Katrina Kaif: 'हाऊज द जोश'? कतरिनाचाच प्रश्न, मिळालं भन्नाट उत्तर!

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com