TV कलाकारांच्या आत्महत्येचं सत्र सुरुच, आणखी एका अभिनेत्रीचा संशयास्पद मृत्यू

या घटना ताज्या असताना आता आणखी एका अभिनेत्रीच्या आत्महत्येची बातमी समोर आली आहे.
manjusha Neogi
manjusha Neogigoogle
Summary

या घटना ताज्या असताना आता आणखी एका अभिनेत्रीच्या आत्महत्येची बातमी समोर आली आहे.

बंगाली टीव्ही इंडस्ट्रीतून आणखी एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. अलीकडेच या इंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेत्री पल्लवी डे आणि बिदिशा डे मजुमदार यांच्या निधनाच्या बातमीने सर्वांनाच धक्का बसला होता. या घटना ताज्या असताना आता आणखी एका अभिनेत्रीच्या आत्महत्येची बातमी समोर आली आहे. मॉडेल आणि बंगाली टीव्ही अभिनेत्री मंजुषा नियोगी हिचा मृतदेह तिच्या फ्लॅटमध्ये संशयास्पद अवस्थेत आढळून आला आहे.

manjusha Neogi
काश्मीरमधील TV अभिनेत्रीची हत्या करणाऱ्या दोन्ही दहशतवाद्यांचा खात्मा

मागील 15 दिवसांमध्ये बंगाली चित्रपटसृष्टीतील या तिसऱ्या अभिनेत्रीने आत्महत्या केली आहे. त्यामुळे या क्षेत्रातील अनेकांनी चिंता व्यक्त केली आहे. याप्रकरणी पोलिसांनी तपास सुरू केला आहे. मिळालेली माहिती अशी की, शुक्रवारी मंजुषाचे पालक घरी नव्हते. ते तिला फोन करत असताना तिने कोणाच्याही फोनला उत्तर दिले नाही. त्यानंतर नेमके काय झाले आहे हे पाहण्यासाठी पालक घरी आले असत, त्यांना तिच्या खोलीत मंजुषाचा मृतदेह पंख्याला लटकलेल्या अवस्थेत आढळून आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंजुषा ही टीव्ही अभिनेत्री विदीशा मजुमदारची चांगली मैत्रिण होती. विदीशाच्या मृत्यूनंतर ती डिप्रेशनमध्ये होती, अशी माहिती तिच्या घरच्यांनी दिली आहे. मात्र अचानक मंजुषाने आत्महत्या केल्याने अभिनेत्रीच्या मृत्यूमागे काय रहस्य आहे का याचा तपास पोलिस करत आहेत. दरम्यान, मागील दोन ते तीन दिवसांपासून मालिका क्षेत्रातील लोकप्रिय अभिनेत्रींच्या आत्महत्येच्या घटना समोर येत आहे. त्यामुळे या क्षेत्रावर शोककळा पसरली आहे. तर दुसरीकडे लागोपाठ होणाऱ्या आत्महत्या का होत आहेत यावर अनेक उलट सुटल चर्चा सुरु आहेत.

manjusha Neogi
मालिका क्षेत्रातील अभिनेत्री विदीशा मुजूमदारचा धक्कादायक मृत्यू

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com