आहेरात भारती सिंगने दिला कुकर, नीतू कपूर म्हणाल्या...

रणबीर कपूर आणि आलिया भट यांच्या लग्नानंतर रणबीरची आई नीतू कपूर ' हुनरबाज'च्या मंचावर पोहोचल्या. यावेळी भारतीने त्यांना कुकर गिफ्ट केला. तेव्हा नीतू कपूर म्हणाल्या.
Bharti Singh gifts Neetu Kapoor a pressure cooker for ‘bahurani’ Alia Bhatt
Bharti Singh gifts Neetu Kapoor a pressure cooker for ‘bahurani’ Alia Bhattsakal

tv entertainment news: हुनारबाज या कलर्स हिंदी वरील कार्यक्रमाची सूत्रसंचालक भारती सिंग आता सेटवर पोहोचली आहे. खरं तर भारतीने या निमित्ताने मोठा आदर्शच घालून दिला आहे. भारती एकही दिवस सुट्टी न घेता प्रसूतीच्या शेवटच्या दिवसापर्यंत काम करत राहीली. आता तर भारतीने सगळे संकेत मोडून कार्य तत्परतेचा नवा दाखला दिला आहे. अवघ्या बारा दिवसाच्या बाळाला घरी ठेऊन ती चित्रीकरणासाठी 'हुनारबाज'च्या (hunarbaaz) च्या सेटवर पोहोचली. आता भारती आली म्हणजे विनोद आणि हसणं आलंच. पण आल्या आल्या तिने थेट नीतू कपूर यांची खिल्ली उडवली.

Bharti Singh gifts Neetu Kapoor a pressure cooker for ‘bahurani’ Alia Bhatt
बारा दिवसांचं बाळ घरी ठेऊन भारती सिंग सेटवर, म्हणाली...

बॉलिवूड मधील सर्वाधिक गाजलेला रणबीर कपूर आणि आलिया भट यांचा विवाह सोहळा सर्वांच्याच लक्षात राहणारा आहे. (ranbir alia wedding) अगदी शेवटच्या दिवसापर्यंत रणबीर आलिया आणि त्यांच्या कुटुंबीयांनी लग्नाची तारीख कळू दिली नाही. हा विवाह सोहळा १४ एप्रिल ला अत्यंत दिमाखात आणि मोजक्याच माणसांच्या उपस्थितीत झाला. सध्या समाज माध्यमांवर या लग्नाचे फोटो व्हायरल होत आहे. लग्नाला काही दिवस होताच रणबीरच्या आई म्हणजे नीतू कपूर यांनी neetu kapoor यांनी हुनारबाजच्या सेट वर हजेरी लावली.

Bharti Singh gifts Neetu Kapoor a pressure cooker for ‘bahurani’ Alia Bhatt
Photo: झगा झगा, मला बघा.. सई ताम्हणकरचा झगा पाहून डोळे फिरतील...

यावेळी भारती सिंग (bharti singh) यांनी नीतू कपूर यांचे जरा हटके स्वागत केले. भारती म्हणाली, 'मूल लहान असल्याने मला लग्नाला येता आले नाही. पण मी खास भेटवस्तू गिफ्ट (gift) करण जोहर यांच्याकडे पाठवले होते. पण तेही तुम्हाला भेटवस्तू द्यायला विसरले. आता तुम्ही इथे आलाच आहात तर मी हे गिफ्ट तुम्हाला देते.' असं म्हणून भारतीने एक गिफ्ट नीतू कपूर यांना दिलं. हे गिफ्ट उघडून पाहतात तर काय, त्यात प्रेशर कुकर होता. (Bharti Singh gifts Neetu Kapoor a pressure cooker for ‘bahurani’ Alia Bhatt)

हा कुकर पाहून नीतू कपूर आश्चर्य व्यक्त करतात आणि म्हणतात, हा कुकर मी माझ्या सुनेला भेट देईन. तिला याचा खूप उपयोग होईल तिच्या स्वयंपाक घरात . त्यावर भारती म्हणजे, 'हो नक्कीच होईल कारण लग्नाचे फोटो पाहिले आम्ही. रणबीर अगदी सुकून गेला आहे. त्यामुळे सुनेला सांगा, या कुकरमध्ये चांगलं जेवण तयार करून रणबीरला खाऊ घालायला.' यावर सगळे हसू लागतात आणि नीतू कपूर म्हणतात, 'फारच विचार करून ही भेटवस्तू देण्यात आली आहे.'

कलर्स टीव्हीने हा धम्माल व्हिडीओ शेअर केला असून त्याला चाहत्यांची पसंती मिळत आहे, विशेष म्हणजे यावेळी नीतू कपूर या आलिया भटच्या गंगुबाई चित्रपटातील ढोलीडा गाण्यावर थिरकल्या आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com