Crime News: लाइव्ह शो दरम्यान भोजपुरी गायिकेवर झाडल्या गोळ्या..पोलिस चौकशीत समोर आलं...

बिहारच्या सारण जिल्ह्यात निशा उपाध्याय ही प्रसिद्ध भोजपुरी गायिका शो साठी गेली असताना ही गंभीर घटना घडली.
Bhojpuri singer nisha upadhyay
Bhojpuri singer nisha upadhyay Esakal

Bhojpuri singer nisha upadhyay : निशा उपाध्याय भोजपुरी मध्ये प्रसिद्ध लोकसंगीत गाणारी गायिका आहे. तिच्या आवाजाच्या जादूनं अनेक लोकांना भुरळ घातली आहे. तिच्या लाइव्ह परफॉर्मन्सला तुफान गर्दी पहायला मिळते.

पण आता तिच्याविषयी एक बातमी समोर येतेय की लाइव्ह शो दरम्यान तिच्यावर कुणीतरी गोळी झाडली. (Bhojpuri singer nisha upadhyay bullet injury in live show in saran bihar)

Bhojpuri singer nisha upadhyay
Mouni Roy: तापमानात पुन्हा वाढ..

मीडिया रिपोर्ट्सनुसार बिहारच्या सारण जिल्ह्यात निशा कार्यक्रमासाठी पोहोचली होती,जिथे तिच्यासोबत ही गंभीर घटना घडली आहे. बोललं जात आहे की ती स्टेजवर परफॉर्म करत होती तेव्हा कोणीतरी हवेत फायरिग केलं आणि त्यादरम्यान गायिकेच्या पायाला गोळी लागली. पोलिसांच्या प्राथमिक तपासात ही गोष्ट कळाली आहे.

या घटनेनंतर निशाला जवळच्या रुग्णालयात दाखल केलं गेलं. सध्या पोलिस प्रकरणाची चौकशी करताना तपास लावण्याचा प्रयत्न करत आहेत की अखेर ही घटना घडली कशी आणि यात कोण कोण सामिल आहेत.

Bhojpuri singer nisha upadhyay
Vivek Agnihotri: 'सगळं मुर्खासारखं सुरू होतं..', बॉलीवूडच्या कलाकारांवर का भडकले अग्निहोत्री?
Bhojpuri singer nisha upadhyay
Alia Bhatt Grandfather Passes Away: आलियावर कोसळला दुःखाचा डोंगर.. अभिनेत्रीच्या आजोबांचे निधन..

निशा उपाध्याय सोशल मीडियावर भलतीच सक्रिय पहायला मिळते आणि फेसबूकवर आपल्या परफ़ॉर्मन्सचे व्हिडीओ शेअर करताना दिसते. सोशल मीडियावर तिच्या व्हिडीओजना तुफान पसंती मिळते. तिची गाणी युट्युबवर नेहमीच चर्चेत असतात.

निशा उपाध्याय आज भोजपुरी सिनेमातील प्रसिद्ध चेहरा आहे. तिनं आपल्य़ा सुमधूर आवाजानं लोकांमध्ये आपली खास ओळख बनवली आहे. सोशल मीडियावर तिचं तगडं फॅ फॉलॉइंग आहे. फेसबूक पेजवर तिचे १० मिलियन म्हणजे १ करोड फॉलोअर्स आहेत. निशाचं स्वतःचं युट्युब चॅनल देखील आहे,जिथे ती तिच्या गाण्याचे व्हिडीओज अपलोड करत असते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com