Big Boss Ott 2 : 'आता आम्ही फक्त नावालाच नवरा बायको'! सगळं संपलंय...

पूजा भट्ट देखील यापैकी एक आहे. तिनं दोन दिवसांपूर्वी तिच्या दारु पिण्याच्या सवयीवरुन तिला ट्रोल करणाऱ्यांना चांगलेच झापले होते.
Aaliya Siddiqui in Big Boss Ott
Aaliya Siddiqui in Big Boss Ott esakal
Updated on

Big Boss OTT 2 Aaliya Siddiqui is over with Nawazuddin : टीव्ही मनोरंजन विश्वात बिग बॉस हा कमालीचा लोकप्रिय झालेला शो आहे. त्यानंतर आता बिग बॉस ओटीटीला देखील नेटकऱ्यांचा मोठा प्रतिसाद मिळालेला दिसतो आहे. यंदाच्या बिग बॉस ओटीटीमध्ये जे सेलिब्रेटी सहभागी झाले आहेत त्यांच्या नावावरुनच या शो ला मोठा प्रतिसाद मिळाल्याचे दिसून येत आहे.

पूजा भट्ट देखील यापैकी एक आहे. तिनं दोन दिवसांपूर्वी तिच्या दारु पिण्याच्या सवयीवरुन तिला ट्रोल करणाऱ्यांना चांगलेच झापले होते. सगळं काही करण्याचा अधिकार हा पुरुषांनाच आहे. महिलांनी काय केले तर त्यांना जाब विचारला जातो. जसे की पुरुषांना दारु पिण्याचा अधिकार आहे. ते कुठेही, कधीही आणि कितीही दारु पिऊ शकतात हेच मात्र महिलांनी केले त्यांना नावं ठेवली जातात.

Also Read - Success Story : अन् त्याने शिक्षणासाठी डोंगरावर मात केली सचिनचा संघर्ष वाचायलाच हवा

पुजा भट्टच्या त्या विधानानं सोशल मीडियावर मोठी खळबळ उडाली होती यासगळ्यात आता बॉलीवूडचा प्रसिद्ध अभिनेता नवाझुद्दीन सिद्धिकीच्या पत्नीनं आलिया सिद्धिकीनं तिच्या वैयक्तिक आय़ुष्याबद्दल एक मोठा खुलासा केला आहे. त्यामुळे नवाझुद्दीनच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. गेल्या काही दिवसांपासून नवाझुद्दीन आणि त्याची पत्नी आलिया यांच्यातील विसंवादानं चाहत्यांना वेगवेगळे प्रश्न पडले आहेत.

बिग बॉस २ ओटीटी मध्ये प्रवेश करण्यापूर्वी आलियानं आता काही गोष्टी शेयर केल्या आहेत. यामध्ये तिनं दिलेल्या एका मुलाखतीमध्ये म्हटले आहे की, मी या शो साठी खूपच उत्साही आहे. गेल्या काही दिवसांपासून या शोमध्ये सहभागी होण्याची माझी तीव्र इच्छाही होती. मात्र एका गोष्टीची खंत आहे ती म्हणजे मला माझ्या मुलांपासून लांब राहावे लागणार आहे.

Aaliya Siddiqui in Big Boss Ott
Bigg Boss OTT: काहीच तासाच पुनीत सुपरस्टारला फेकलं घराबाहेर, केली मोठी चुक

नवाझुद्दीन आणि माझ्यात आता काही नाते राहिलेले नाही. आम्ही फक्त मुलांसाठी एकत्र आहोत. नवाझला देखील वाटत होते की मी आता माझे काही वेगळे करिअर सुरु करु म्हणून.त्याची सुरुवात आता करते आहे. याचा आनंद आहे. त्यानं मला या शो साठी प्रेरित केले आहे. मला नेहमीच दिग्दर्शक व्हायची इच्छा होती. पण ते काही होऊ शकले नाही. आता वेगळा प्रयत्न करते आहे. अशी प्रतिक्रिया आलियानं दिली आहे.

Aaliya Siddiqui in Big Boss Ott
'Gadar 2'च्या दमदार टीझरची झलक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com