...म्हणून हिंदुस्तानी भाऊनं 15 लाख फॉलोवर्सचं टिकटॉक अकाऊंट केलं डिलिट

youtube vs tiktok war, bigg boss fame,  hindustani bhau
youtube vs tiktok war, bigg boss fame, hindustani bhau

मुबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 'आत्मनिर्भर भारत' चा नारा दिल्याने अनेक भारतीय विदेशी वस्तू वापरणे टाळत आहेत. सोशल मीडियावर लोकप्रिय असलेल्या चीनी टिकटॉक अॅपवर बंदी आणण्याची मागणी जोर धरु लागली आहे.  #BanTikTokIndia हा हॅशटॅग ट्विटरवर सध्या ट्रेंडिंगमध्ये असून 70 हजारांपेक्षाही अधिक लोकांनी टिकटॉकवर बंदी आणण्याची मागणी केली आहे.  सेलेब्रिटी असलेल्या ‘हिंदुस्तानी भाऊ’ने आपले टिकटॉक अकाऊंट डिलिट केले आहे. हिंदुस्तानी भाऊने IGTV व्हीडिओ करत आपल्या अनेक चाहत्यांसमोर आपण टिकटॉक सोडत असल्याचे जाहीर केले. विशेष म्हणजे हिंदुस्तानी भाऊचे टिकटॉकवर 15 लाख फॉलोवर्स आहेत. त्यामुळे त्याच्या या कृतीवर आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

कॅरी मिनती याच्या समर्थनात हिंदुस्तानी भाऊने हे पाऊल उचलले आहे. कॅरी मिनती याने युट्यूबवर YouTube vs TikTok हा व्हीडिओ शेअर केला होता. यातून त्याने या दोन्ही माध्यमांची तुलना केली होती. कॅरीच्या या व्हीडिओला मोठ्या प्रमाणात पसंतीही मिळाल्याचे पाहायला मिळाले. मात्र, नियमांची पायमल्ली होत असल्याचे कारण देत युट्यूबने हा व्हीडिओ हटवला होता. त्यानंतर नेटकऱ्यांनी चीन अॅपला नापंसती दर्शवत ट्विटरवर #BanTikTokIndia हा हॅशटॅग ट्रेंड केला आहे. यातून त्यांनी युट्यूबयुजर्संना समर्थन दिले आहे.

गेल्या काही दिवसांपासून युट्यूयुजर्स आणि टिकटॉक स्टार्समध्ये चांगलीच खडाजंगी सुरु आहे. टिकटॉक स्टार आमीर सिद्धीकीने युट्यूबयुजर्संना छेडल्याने या वादाला सुरुवात झाली होती. युट्यूबयूयर्स टिकटॉकवरील कंटेंटविषयी द्वेषपूर्ण माहिती पसरवत असल्याचा आरोप त्याने केला होता. त्यावर युट्यूयुर्संनी आमीर सिद्धीकीचा चांगलाच समाचार घेतला होता. त्यामुळेच ट्विटरवर टिकटॉक अपवर बंदी आणण्याची मागणी होऊ लागली आहे. टिकटॉकवर बंदी आणण्याची मागणी भारतात यापूर्वीही अनेकदा झाली आहे. नरेंद्र मोदी यांनी स्वदेशीचा नारा दिल्याने अनेकांनी टिकटॉक न वापरण्याचा पवित्रा घेतला आहे. असे असले तरी टिकटॉक हे देशात मोठ्या प्रमाणात वापरले जाणारे अप आहे. अनेकांना या अपने व्यासपीठ उपलब्ध करुन दिला असल्याने अनेकजण या माध्यमातून व्यक्त होत असतात. शिवाय सध्या लॉकडाऊनचा काळ असल्याने अनेकजण टिकटॉकचा आधार घेताना दिसत आहेत.

नुकतेच टिकटॉकने जगभरात 200 कोटी डाऊनलोडचा टप्पा पार केला आहे. शिवाय भारतातही टिकटॉकचा चांगलाच दबादबा आहे. टिकटॉकचे भारतातील प्रमुख निखिल गांधी यांनी वर्षअखेर 50% भारतीयांच्या मोबाईलमध्ये हे अप असेल असा विश्वास व्यक्त केला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com