बिचुकलेनंतर आता राखीवर सलमान भडकला, 'ती तर खुपच...'

Bigg Boss Season 15: भारतीय टेलिव्हिजन मनोरंजन क्षेत्रातील (Tv entertainment) प्रसिद्ध शो म्हणून बिग बॉसची (Bigg boss) ओळख आहे. यंदा या शो चा 15 वा सीझन सुरु आहे.
Salman Khan and rakhi Sawant
Salman Khan and rakhi Sawant

Bigg Boss Season 15: भारतीय टेलिव्हिजन मनोरंजन क्षेत्रातील (Tv entertainment) प्रसिद्ध शो म्हणून बिग बॉसची (Bigg boss) ओळख आहे. यंदा या शो चा 15 वा सीझन सुरु आहे. गेल्या काही दिवसांपासून या रियॅलिटी शो (reality show) नं प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले आहे. या शोचा होस्ट सलमान खान (Salman Khan) हा सहभागी स्पर्धक अभिजित बिचुकलेवर (Abhijeet Bichukle) भडकला होता. त्यावर बिचुकलेनं देखील सलमानला जशास तशी प्रतिक्रिया दिली होती. आता अभिजितनंतर सलमाननं राखीला चांगलेच सुनावले आहे. त्यानं जी प्रतिक्रिया दिली आहे त्यामुळे त्यांच्यातील चर्चा व्हायरल झाली आहे. सलमान राखीला (Rakhi Sawant) काय म्हणाला आहे हे आपण जाणून घेणार आहोत.

बिग बॉस शो चे आता केवळ दोन आठवडे राहिले आहेत. काही दिवसांपासून वेगवेगळे बदल या शो मध्ये झाले आहेत. प्रेक्षकांचे काही करुन मनोरंजन करणे, त्यांचे लक्ष वेधून घेणे यासाठी बिग बॉस हा प्रसिद्ध शो आहे. जेव्हा यंदाच्या सीझनला सुरुवात झाली त्यावेळी त्याचा टीआरपी कमालीचा घसरला होता. आता त्यावरुन देखील वेळेपूर्वीच हा शो बंद होणार असल्याचे निर्मात्यांनी सांगितले होते. मात्र पूर्वीच्या स्पर्धकांना पुन्हा बिग बॉसमध्ये बोलविण्यात आले. त्यांनी प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले. तेच स्पर्धक वादाचे कारण ठरताना दिसत आहे. त्यावर सलमान भडकला आहे.

Salman Khan and rakhi Sawant
Bigg Boss Marathi 3: जाणून घ्या, विशाल निकम जिंकलेल्या रकमेचं काय करणार?

यापूर्वी सलमाननं अभिजित बिचुकलेवर टीका केली होती. ती सहन न झाल्यानं बिचुकलेनं देखील सलमानला जशास तसे उत्तर दिले होते. तो म्हणाला होता की, मलाही या शो ची काही गरज नाही. मी हवं तर या शोमधून निघून जातो. आता सलमाननं राखी सावंतवर टीका केली आहे. तो तिला म्हणाला, ती फारच बोरिंग आहे. ती काही करुन प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेण्यासाठी प्रयत्नशील असते. फार रागीष्ट आहे. मात्र तिचा त्याला तोटाही झाला आहे. कोणत्यावेळी कसं वागावं याविषयी तिला फारसं काही कळत नाही. अशी टीका सलमाननं केली होती.

Salman Khan and rakhi Sawant
Bigg Boss Marathi 3 Winner: सांगलीच्या विशाल निकमबद्दल काही खास गोष्टी..

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com