aamir khan
aamir khan esakal

दहावी - बारावीच्या परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना आमिरचा गुरुमंत्र, तुम्ही फक्त...

आमिर खान हा नेहमीच त्याच्या वेगळेपणासाठी ओळखला जाणारा (Aamir Khan) अभिनेता आहे.

Bollywood News: आमिर खान हा नेहमीच त्याच्या वेगळेपणासाठी ओळखला जाणारा (Aamir Khan) अभिनेता आहे. तो जे काही सांगतो हे ऐकणार आणि फॉलो करणारा मोठा चाहतावगर्ग आहे. त्याला मिळणारा प्रतिसादही मोठा आहे. गेल्या काही दिवसांपासून सोशल (Social Media News) मीडियावर आमिर हा सक्रिय झाला आहे. एरवी सोशल मीडियापासून (Viral News)चार हात लांब राहणाऱ्या आमिरनं व्यक्त केलेल्या प्रतिक्रियांना नेटकऱ्यांकडून दाद मिळताना दिसते आहे. त्यानं आता दहावी - बारावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी शुभेच्छा (Entertainment News) दिल्या आहेत. आयुष्याच्या एका महत्वाच्या टप्प्याला सामोरं जात असताना विद्यार्थ्यांनी काय करायला हवं हे सांगायला आमिर विसरलेला नाही. त्याच्या त्या पोस्टला नेटकऱ्यांकडून मोठा प्रतिसाद मिळताना दिसतो आहे.

बॉलीवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट (Bollywood Actor) अशी ओळख असलेल्या आंमिरचा सल्ला म्हणजे परफेक्टच असणार अशी त्याच्या चाहत्यांची धारणा आहे. त्यानं गेल्या काही वर्षांत स्वताची ओळख प्रभावशील अभिनेता म्हणून तयार केली आहे. त्यामुळे एखाद्या गोष्टीबाबत आमीर काय बोलतो याकडे त्याच्या चाहत्यांची नजर असते. गेल्या चार वर्षांपासून चर्चेत असलेल्या लाल चढ्ढा सिंगची चर्चा आहे. तो नाताळामध्ये प्रदर्शित होणार आहे. आमिर सध्या त्याच्या प्रमोशनमध्ये गडबडीत आहे. मात्र यासगळ्यात तो दहावी - बारावीच्या विद्यार्थ्यांना शुभेच्छा द्यायला विसरलेला नाही. आमिर हा एक प्रेरणादायी व्यक्तिमत्व असून त्याला फॉलो करणाऱ्यांची संख्या मोठी आहे.

aamir khan
Video viral: सुजल जगदाळे उर्फ बुलट कुठं बसलंय बघा! पेपर सोडून आला बैलगाडा शर्यतीत

आमिरनं त्याच्या सोशल मीडिया अकाउंटवरुन एक पोस्ट शेयर केली आहे. त्यामध्ये तो लिहितो, दहावी -बारावीची परीक्षा देणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना मी मनुपूर्वक शुभेच्छा देतो. तुम्ही त्या परिक्षेमध्ये तुमच्यातलं सर्वोत्तम द्या. बाकी सगळं सोडून द्या. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा. ते म्हणजे ऑल इज वेल... त्यापुढे आमिरनं इमोजी शेयर केला आहे. आमिरनं यापूर्वी तारे जमीन पर, 3 इडियट्स सारखे चित्रपट तयार करुन त्यानं युवकांना प्रेरणा देण्यात महत्वाची भूमिका बजावली होती.

aamir khan
Photo Viral: मुलासोबत आमिर खान घेतोय आंब्याचा आस्वाद!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com