पत्नीला ब्रेस्ट कॅन्सर, आयुषमान हादरला: लोकांना आमच्यासोबत सेल्फी हवा होता|Bollywood Actor Ayushman Khurrana | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Ayushaman And tahira news

पत्नीला ब्रेस्ट कॅन्सर, आयुषमान हादरला: लोकांना आमच्यासोबत सेल्फी हवा होता

Bollywood News: हटक्या अभिनयान बॉलीवूडमध्ये वेगळं स्थान निर्माण करणारा अभिनेता म्हणून आयुषमाननं मोठी प्रसिद्धी मिळवली आहे. त्याचा स्वतंत्र प्रेक्षकवर्ग आहे. सोशल (Ayushman Khurrana) मीडियावर नेहमीच चर्चेत असणाऱ्या आयुषमानला मोठा हादरा बसला आहे.त्याच्या पत्नीच्या आरोग्याबाबत एक मोठी बातमी समोर आली आहे. त्याच्या पत्नी (wife tahira kashyap) ताहिराच्या आजारपणानं त्याला चिंतेत पाडलं आहे. बॉलीवूडमध्ये ताहिरा आणि आयुषमान हे नेहमीच वेगवेगळ्या कारणासाठी चर्चेत असतात. आता ताहिराला कॅन्सर सारखा गंभीर आजार जडला आहे. जेव्हा त्याला ताहिराच्या या आजाराविषयी कळलं तेव्हा तो (bollywood celebrity) हादरून गेला होता. अशावेळी काय करावं हे त्याला काही सुचेनासे झाले. मात्र यासगळ्यातून त्यानं कशाप्रकारे वाट काढली याविषयी चर्चा सुरु झाली आहे.

आयुषमान हा एक प्रभावी अभिनेता आहे.त्यानं अल्पावधीत मोठं स्थान निर्माण केल्याचे दिसून आले आहे. त्याच्या चित्रपटाचा प्रेक्षकवर्गही मोठा आहे. तो केवळ एक चांगला अभिनेताच नव्हे तर लोकप्रिय गायकही आहे. त्यानं आजवर त्याच्या अनेक चित्रपटांतून गाणी गायली असून त्याला चाहत्यांचा जबरदस्त प्रतिसादही मिळाला आहे. सध्या त्याची पत्नी ताहिरा ही चर्चेत आली आहे. ताहिराला दोन मुलं आहेत. ती एक लेखिका आहे आणि सध्या ती कॅन्सरसारख्या आजाराला सामोरं जात असल्याचे दिसून आले आहे. आयुषमानला यासगळ्या विषयी काहीही माहिती नव्हतं. एका प्रसंगातून जेव्हा ते माहिती पडलं. तेव्हा मात्र त्याच्या पायाखालची वाळू सरकली.

आयुषमानला जेव्हा ताहिराला कॅन्सर असल्याचे कळले तेव्हा त्यानं सांगितलं की, आम्ही तेव्हा दिल्लीमध्ये एका डॉक्टरकडे होतो. खरं तर आम्हाला काही माहिती नव्हतं. मात्र त्यांनी आम्हाला एक महत्वाची गोष्ट सांगायची आहे असं सांगून आम्हाला मोठा धक्का दिला होता. ती बातमी ऐकल्यावर आम्ही मुळापासून हादरुन गेलो. काय बोलावं, करावं हे सुचेनासं झालं. एकीकडे रुग्णालयात असणाऱ्या व्यक्तींना आमच्यासोबत फोटो काढायचे होते. दुसरीकडे आमच्या डॉक्टरांनी जी बातमी दिली त्यानं आम्ही सुन्न झालं होतो. त्या रुग्णालयातील सुरक्षारक्षकाला देखील वाईट वाटलं होतं.