बॉलिवूड अभिनेता कार अपघातात जखमी; पत्नीलाही दुखापत

Hemant Birje
Hemant Birje
Summary

मुंबई पुणे एक्सप्रेस हायवेवर एका टोलनाक्याजवळ गाडी रस्त्याच्या दुभाजकाला धडकून अपघात झाला.

मुंबई पुणे एक्सप्रेस हायवेवर बॉलिवूड अभिनेता हेमंत बिरजे (Hemant Birje) आणि त्यांच्या पत्नीच्या गाडीला अपघात झाला. यात दोघेही किरकोळ जखमी झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. मंगळवारी रात्री उशिरा हा अपघात झाला.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, कार रस्त्यावर असलेल्या दुभाजकाला धडकली. उर्से टोल नाक्याजवळ रात्री आठच्या सुमारास ही घटना घडली. यामध्ये अभिनेता हेमंत बिरजे आणि त्यांच्या पत्नीला किरकोळ दुखापत झाली आहे.

Hemant Birje
मतभेद असले तरी मी चुकलोच, सिद्धार्थने मागितली सायनाची माफी

अपघातावेळी अभिनेता हेमंत बिरजेसह त्याची पत्नी आणि मुलगीसुद्धा गाडीमध्ये होते. यात मुलीला काही दुखापत झाली नसल्याची माहिती पोलिस निरिक्षक सत्यवान माने यांनी दिली. हेमंत बिरजे आणि त्यांच्या पत्नीला पवना रुग्णालयात दाखल करण्यात आले असल्याचंही पोलिसांनी सांगितले.

हेमंत बिरजे यांनी १९८५ मध्ये अॅडव्हेंचर्स ऑफ टार्झन चित्रपटात प्रमुख भूमिका साकारली होती. यानंतर अनेक चित्रपटांमधून त्यांनी काम केलं. मात्र चित्रपट फ्लॉप झाल्यानंतर ते नंतर पडद्यावर दिसले नाहीत. मध्यंतरी त्यांची आर्थिक परिस्थिती बिकट झाल्याच्या बातम्यासुद्धा आल्या होत्या.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com