ईशान खट्टर साकारणार 'ध्यानचंद', हॉकीच्या जादुगारावर 'बायोपिक'|Bollywood Actor Ishaan Khattar | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ishaan khattar

ईशान खट्टर साकारणार 'ध्यानचंद', हॉकीच्या जादुगारावर 'बायोपिक'

Bollywood News: बॉलीवूडमधील प्रसिद्ध निर्माता रॉनी स्क्रुवाला(Ronnie Screwvala) यांनी वेगवेगळ्या चित्रपटांची मेजवानी आतापर्यत प्रेक्षकांना दिली आहे. आता त्यांचा हटके विषयावर चित्रपट येतो आहे. त्याचे नाव ध्यानचंद असून (Dhyanchand Movie) तो भारतातील हॉकीचे जादुगार म्हणून ज्यांना ओळखलं (bollywood movies) गेलं त्या मेजर ध्यानचंद यांच्या आयुष्यावर आधारित आहे. या चित्रपटाची शुटींग लवकरच सुरु होणार आहे. सोशल मीडियावरुन सध्या ध्यानचंद चित्रपटाविषयी काही अपडेट्स समोर आल्या असून त्यानुसार यात प्रमुख भूमिका प्रसिद्ध अभिनेता ईशान खट्टर (Bollywood Actor) प्रमुख भूमिका साकारणार असल्याचे सांगण्यात आले आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन अभिषेक चौबेनं केलं आहे. गेल्या अनेक दिवसांपासून ध्यानचंद ( Dhyan Chand) यांच्या आयुष्यावरील चित्रपटाची चर्चा सुरु होती.

जगात हॉकीचे जादुगार म्हणून ज्यांना ओळखले जाते अशा मेजर ध्यानचंद यांचे हॉकीवरील प्रभुत्व पाहून जर्मनीचा हुकूमशहा हिटलरही प्रभावित झाला होता. असं सांगितलं जातं. ध्यानचंद यांच्या आयुष्यावरील चित्रपटासाठी रॉनी स्क्रुवाला यांच्या टीमनं रिसर्च सुरु केला आहे. सुरुवातीच्या काळात मुख्य भूमिकेत कोण दिसणार यावरुन वेगवेगळ्या अभिनेत्यांची नावं समोर आली होती. आता त्यात ईशान खट्टर हा दिसणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. दोन दिवसांपूर्वी ईशान आणि त्याची गर्लफ्रेंड अनन्या पांडे यांच्यात ब्रेक अप झाल्याच्या बातम्या व्हायरल झाल्या होत्या. पिंकविलाच्या एका रिपोर्टनुसार ध्यानचंद या चित्रपटाच्या शुटिंगला यावर्षी नोव्हेंबरमध्ये सुरुवात होणार आहे.

हेही वाचा: Viral Video: तुमच्या ताटात असा जिवंत मासा आला तर...

चित्रपटाशी संबंधित सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर अभिषेक बॅनर्जी हे प्री प्रॉडक्शनचे काम सुरु करणार आहे. सध्या या चित्रपटाचे दिग्दर्शक अभिषेक चौबे हे कोंकणा सेन शर्मा आणि मनोज वाजपेयी यांना घेऊन एका प्रोजेक्टमध्ये व्यस्त आहेत. काही दिवसांनंतर ईशानच्या ट्रेंनिगला सुरुवात होणार आहे. यापूर्वी अभिषेक यांच्यासोबत उडता पंजाबसाठी ईशान खट्टरनं सहाय्यक दिग्दर्शक म्हणून भूमिका पार पाडली होती. सध्या ईशान हा गुरमित सिंग यांच्या फोन भुत नावाच्या चित्रपटामध्ये व्यस्त असल्याचे दिसून आले आहे. यापूर्वी ईशान हा सुटेबॉल बॉय नावाच्या वेब सीरिजमध्ये चमकला होता. त्याच्या य़ा भूमिकेचं प्रेक्षकांनी कौतूक केलं होतं.

Web Title: Bollywood Actor Ishaan Khattar Prepare Lead Role In Dhayanchand Latest Update

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top