Milind soman
Milind soman

मिलिंद सोमणचं 'हटके सेलिब्रेशन'!, पत्नीसोबत 110 किमीची दौड

बॉलीवूडमध्ये (bollywood) असे काही सेलिब्रेटी आहेत ज्यांची त्यांच्या हटकेपणामुळे चर्चा होत असते.

Milind Soman New Year 2022 Celebration : बॉलीवूडमध्ये (bollywood) असे काही सेलिब्रेटी आहेत ज्यांची त्यांच्या हटकेपणामुळे चर्चा होत असते. यापैकी एक सेलिब्रेटी म्हणजे अभिनेता मिलिंद सोमण(Milind Soman). या अभिनेत्यानं वयाची पन्नाशी ओलांडली असली तरी त्याचा फिटनेस आजही तरुणांना लाजवणारा आहे. त्यामुळे त्याच्या फिटनेसची चर्चा होत असते. तोच नाही तर त्याची आई, पत्नी (Ankita) यांच्या फिटनेसचे (Fitness) व्हिडिओ देखील नेटकऱ्यांचं लक्ष वेधून घेताना दिसतात. सध्या सेलिब्रेटींच्या न्यु इयर सेलिब्रेशनची चर्चा सुरु आहे. अशा वेळी मिलिंद सोमणची सेलिब्रेशन म्हटल्यावर त्याच्या हटके सेलिब्रेशनचं नेटकरी कौतूक करत आहे. त्यानं केलेल्या आगळ्या वेगळ्या सेलिब्रेशनविषया आपण जाणून घेणार आहोत.

मिलिंदनं त्याच्या पत्नी अंकितासमवेत तब्बल 110 किमीची दौड (Milind and Ankita 110 km race) केली आहे. त्यानंतर त्यानं 1 जानेवारीला सोशल मीडियावर एक पोस्ट केली आहे. त्यामध्ये तो म्हणतो, आमच्याकडून सर्व चाहत्यांना नववर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. मी अंकितानं 110 किमीची दौड पूर्ण केली आहे. आम्ही आता जैसलमैरमध्ये आहोत. हा एक वेगळा अनुभव होता. आम्ही त्याचा आनंद घेतला आहे. तुम्हा सर्वांना नव्या वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा...मिलिंदच्या या पोस्टला चाहत्यांनी लाईक करुन त्याला प्रतिक्रिया दिल्या आहे. मिलिंद हा त्याच्या फिटनेससाठी ओळखला जाणारा सेलिब्रेटी आहे. त्याच्यासोबत फोटो घ्यायचा म्हटल्यावर तो चाहत्याला काही ना काही वर्कआऊट करायला भाग पाडतो. असे दिसून आले आहे.

डेली वर्कआऊट आणि फिटनेस याबाबत मिलिंदचं कुटूंब कमालीचं दक्ष असल्याचे दिसून आले आहे. 2021 मध्ये देखील मिलिंदनं वेगवेगळ्या प्रकारचे फोटो आणि व्हिडिओ पोस्ट करुन आपल्या चाहत्यांना फिटनेसचं महत्व पटवून दिलं होतं. कोरोनाच्या काळात देखील मिलिंदनं चाहत्यांना कशाप्रकारे वर्कआउट करुन हेल्ही राहता येईल याची प्रात्यक्षिकं दिली होती. त्यालाही चाहत्यांचा मोठा प्रतिसाद मिळाला होता. दरम्यान गेल्या वर्षी तो त्याच्या एका फोटोमुळे वादाच्या भोवऱ्यातही सापडला होता. गोव्याच्या समुद्रकिनारी त्यानं काढलेल्या त्या फोटोमुळे सोशल मीडियातून त्याच्यावर नेटकऱ्यांनी टीका केली होती.

Milind soman
Bollywood patriotic dialogues 'दुध मांगोगे तो खिर देंगे कश्मिर मागोंगे तो ...'

आताच्या व्हिडिओतून मिलिंदनं 2021 मधील आपली सर्वात मोठी दौड पूर्ण केल्याचे म्हटले आहे. त्याच्या त्या पोस्टवरुन नेटकऱ्यांनी त्याचे कौतूक केले आहे. त्यानं तीन दिवसांपूर्वी आपण जैसलमैरमधून आपण 110 किमीच्या रनिंगला सुरुवात करत आहोत असे लिहिले होते.

Milind soman
कंगणाने केली पुन्हा टिवटिव; '' India Reject Bollywood'' हॅशटॅग मधून निषेध

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com