नाना पाटेकरांचा 'दीनानाथ मंगेशकर पुरस्कारानं' सन्मान | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

नाना पाटेकरांचा 'दीनानाथ मंगेशकर पुरस्कारानं' सन्मान
नाना पाटेकरांचा 'दीनानाथ मंगेशकर पुरस्कारानं' सन्मान

नाना पाटेकरांचा 'दीनानाथ मंगेशकर पुरस्कारानं' सन्मान

मुंबई - आपल्या अभिनयानं प्रेक्षकांच्या हदयाचा ठाव घेणारे अभिनेते म्हणून नाना पाटेकर यांचे नाव घेता येईल. वैशिष्ट्यपूर्ण अभिनय यामुळे नाना कायमच चाहत्यांच्या आवडीचे अभिनेते राहिले आहेत. त्यांचे संवादफेक, देहबोली, हावभाव हे साऱं चाहत्यांच्या मनाला थेट भिडते. यामुळे नाना कायमच चाहत्यांसाठी स्पेशल आहेत. नानांचा नुकताच मास्टर दीनानाथ मंगेशकर स्मृती प्रतिष्ठानच्यावतीनं सन्मान करण्यात आला. यावेळी त्यांना दीनानाथ मंगेशकर पुरस्कारानं गौरवण्यात आले. त्यांच्यासह संगीत, नाटक, कला आणि सामाजिक कार्यामध्ये धडाडीनं काम करणाऱ्या व्यक्तींचा यावेळी गौरव करण्यात आला.

विलेपार्ल्यातील एका सभागृहात पार पडलेल्या या सोहळ्यामध्ये दीनानाथ मंगेशकर जीवन गौरव पुरस्कार प्रख्यात संगीतकार प्यारेलाल शर्मा यांना प्रदान करण्यात आला. तसेच उषा मंगेशकर यांना संगीत क्षेत्रातील योगदानासाठी दीनानाथ पुरस्कारानं सन्मानित करण्यात आले. याबरोबरच मीना मंगेशकर यांना आणि सिनेमा क्षेत्रातील योगदानासाठी प्रेम चोप्रा यांनाही गौरविण्यात आले. पत्रकारिता क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरीसाठी खासदार आणि संपादक संजय राऊत यांनाही सन्मानित करण्यात आले. साहित्य क्षेत्रात गौरवास्पद कामगिरी करणाऱ्या संतोष आनंद यांना वाग्विलासिनी पुरस्कार प्रदान करण्यात आला. याबरोबरच कवयित्री नीरजा, डॉ.प्रतीत समदानी, डॉ.राजीव शर्मा, डॉ.जनार्दन निंबोळकर, डॉ.अश्विन मेहता, यांनाही यावेळी गौरविण्यात आले.

हेही वाचा: तिसऱ्या लग्नासाठी आमिर खान तयार; कोण आहे ती अभिनेत्री?

हेही वाचा: 'दबंग गर्ल' होणार 'खान कुटूंबियांची' सून?

याप्रसंगी आपल्या भावना व्यक्त करताना पंडित हदयनाथ मंगेशकर म्हणाले, महाराष्ट्राच्या सांस्कृतिक इतिहासामध्ये मास्टर दीनानाथ मंगेशकर यांचे योगदान मोठे आहे. त्यांनी संगीत क्षेत्रामध्ये केलेली कामगिरी मोठी आहे. त्यांचे काम नेहमीच संगीत क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या पिढीसाठी प्रेरणादायी असेल.

loading image
go to top