बॉलीवूडमध्ये काळी अभिनेत्री दाखवा, नवाजुद्दीन सिद्धिकी वर्णभेदावर भडकला

नवाझुद्दीन त्याच्या परखड प्रतिक्रियेसाठी ओळखला जातो. तो सतत राजकीय, सामाजिक, परिस्थितीबद्दल भाष्य करत असतो.
nawazuddin sidhiqui
nawazuddin sidhiquiesakal

Bollywood Actor: आपल्या अभिनयानं प्रेक्षकांच्या मनात आदराचं स्थान मिळवणाऱ्या अभिनेत्यांमध्ये नवाझुद्दीन सिद्धिकीचं (Nawazuddin Siddiqui) नाव घ्य़ावं लागेल. सध्याच्या घडीला तो बॉलीवूडमधील सर्वोत्तम अभिनेता आहे. त्याचा चाहतावर्ग मोठा आहे. सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असणाऱ्या (Bollywood News) नवाझुद्दीन त्याच्या परखड प्रतिक्रियेसाठी ओळखला जातो. तो सतत राजकीय, सामाजिक, परिस्थितीबद्दल भाष्य करत असतो. यापूर्वी त्यानं बॉलीवूडमधील वर्णभेदावर, नेपोटिझमवर भाष्य केले होते. आताही एका कार्यक्रमाच्या निमित्तानं त्यानं बॉलीवूडमधील वर्णभेदावर कडाडून टीका केली आहे. आपण समजतो तसं बॉलीवूड तर अजिबात नाही. याठिकाणी कुणी कुणाला सहजासहजी स्विकारायला मागत नाही. त्यामुळे मलाही पहिल्यांदा फार मोठ्या प्रमाणात संघर्षाला सामोरं जावं लागलं. असं त्यानं सांगितलं आहे.

एका मुलाखतीच्या माध्यमातून नवाझुद्दीननं बॉलीवूडमधील सत्य प्रेक्षकांसमोर आणलं आहे. बॉलीवूडमध्ये वर्णभेद आहे का असा प्रश्न मुलाखत कर्त्यानं नवाझुद्दीनला विचारला. त्यावर तो म्हणाला, हो आहे तर, मला बॉलीवूडमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे विचारप्रवाह दिसून येतात. प्रेक्षकांना फक्त आमचा चित्रपट, अमुक एखादा हिरो, अभिनेत्री या माहिती असतात. मात्र पडद्यामागे काय चालते याविषयी त्यांना काहीच कल्पना नसते. बॉलीवूडमध्ये अनेक गोष्टींबाबत नकारात्मकता आहे. त्याचा परिणाम आता नवोदित कलाकारांना होतो आहे. त्यात सर्वात महत्वाचा मुद्दा म्हणजे वर्णभेद आणि वर्चस्ववाद. या दोन्ही गोष्टी बॉलीवूडमध्ये आहे.

nawazuddin sidhiqui
Jhund Movie Review: प्रवाहाबाहेरील टीमची व्यवस्थेला 'कीक'

नेहमी या दोन गोष्टींची चर्चा होत असते. मी त्यावर असं म्हणेन की, मला बॉलीवूडमध्ये एक काळ्या रंगाची अभिनेत्री दाखवा, आहे का आपल्याकडे उत्तर.... दरवेळी गोऱ्या रंगाच्या अभिनेत्री आपल्या समोर येतात. मग ज्या काळ्या रंगाच्या अभिनेत्री आहेत त्यांना जाणीवपूर्वक डावलण्यात येते. त्याचा परिणाम त्यांच्या करिअरवरही होतो. हे आपण लक्षात घ्यायला तयार नाही. बॉलीवूडमध्ये घराणेशाही आहे. हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. याठिकाणी मी माझ्या संघर्षांच्या जोरावर स्वताचे स्थान निर्माण केले आहे. आणि मी स्टार अभिनेत्यांइतकेच मानधन घेतो. कारण मी स्वताला सिद्ध केलं आहे. अशीही प्रतिक्रिया नवाझुद्दीननं यावेळी दिली.

nawazuddin sidhiqui
Movie Review: बच्चन पांडे पाहायला जातायं, पण, तो तर...

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com