Bollywood Latets Marathi News | आर माधवनचा मुलगा म्हणून कुणीही ओळखू नये, वेदांतची मोठी गोष्ट | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

R madhavan and Vedant, Actor R Madhavan Latest Marathi News Updates, Bollywood Latest Marathi News

आर माधवनचा मुलगा म्हणून कुणीही ओळखू नये, वेदांतची मोठी गोष्ट

Bollywood Movies: बॉलीवूडचा प्रसिद्ध अभिनेता आर माधवनच्या मुलानं वेदांतनं (Actor R Madhavan) मोठा पराक्रम केला. त्यानं डॅनिश ओपन स्पर्धेमध्ये 800 (danish open swimming compitation) मीटर जलतरण स्पर्धेमध्ये सुवर्ण पदकाची कमाई केल्याचे दिसून आले. त्यामुळे त्याच्यावर सध्या मोठ्या प्रमाणात कौतुकाचा वर्षाव होत आहे. केवळ आर माधवनच्या चाहत्यांनीच नव्हे तर बॉलीवूडमधील (Bollywood Actor) वेगवेगळ्या सेलिब्रेटींनी देखील वेदांतला मोठ्या प्रमाणात शुभेच्छा दिल्या आहे. दोन दिवसांपूर्वी देसी गर्ल प्रियंका चोप्रानं (Priyanka Chopra) वेदांतला शुभेच्छा देताना आर माधवनला तुला तुझ्या मुलावर अभिमान हवा. अशा शब्दांत प्रतिक्रिया दिली होती. ती प्रतिक्रिया सोशल मीडियावर व्हायरल झाली होती. आता वेदातनं एक मोठी गोष्ट सांगितली आहे. त्यामध्ये त्यानं ज्याप्रकारे स्वताला व्यक्त केली आहे त्याचं कौतुक होत आहे. (Bollywood Latest Marathi News)

वेदांतनं आपल्या विजयाचे सारे श्रेय हे त्याच्या आई वडिलांना दिले. त्यात तो म्हणतो, माझा विजय हा बाबा आणि आई यांच्यामुळे आहे. माझे परिश्रम तर आहेतच मात्र त्यांच्या सहकार्याशिवाय काहीही शक्य झालं नसतं. हे यावेळी सांगावेसे वाटते. मात्र मला एक गोष्ट सांगायची आहे ती म्हणजे केवळ मी आर माधवन यांचा मुलगा आहे म्हणून सगळ्यांनी मला ओळखावे असे वाटत नाही. त्याचे कारण मला माझी स्वताची ओळख निर्माण करायची आहे. त्यादृष्टीनं मी वाटचाल सुरु केली आहे. त्याची तयारीही करतो आहे. गेल्या काही दिवसांपासून माझ्यावर कौतुकाचा वर्षाव होताना दिसतो आहे. मला त्यानं आनंद नक्कीच झाला आहे. मात्र मी तेवढ्यावरच थांबणारा नाही. त्यापेक्षा काही वेगळं करुन दाखवायचे आहे.

हेही वाचा: आयुषमान नावाच्या स्पेलिंगमध्ये दोन वेळा N, R का लिहितो?

वेदांतनं एका मुलाखतीमध्ये सांगितलं की, मला याठिकाणापर्य़त येण्यासाठी खूप संघर्ष करावा लागला. त्यासाठी मी माझ्या आई वडिलांना त्याचे श्रेय देतो. त्यांच्याशिवाय काहीही शक्य नव्हतं. ते दोघेही माझ्यासाठी खूप मेहनतही घेतात. त्यामुळे आता माझ्यावरील जबाबदारी वाढली आहे. याचा विचार मी करतो आहे. त्यांनी माझ्यासाठी जो काही त्याग केला आहे त्यासाठी मी त्यांना नेहमीच आनंदी ठेवण्याचा प्रयत्न करेल आणि माझी वेगळी ओळख निर्माण करेल. हे मला यानिमित्तानं सांगायला आवडेल. दुबईमध्ये जेव्हा शिफ्ट होण्याची वेळ आली तेव्हा माझ्या आई वडिलांनी तो त्याग केला. हे मी विसरु शकत नाही. असेही वेदातनं यावेळी सांगितले.

हेही वाचा: Photo viral - तारक मेहतामधील बाबुलालच्या मुलीचं लग्न, चर्चा तर होणारच!

Web Title: Bollywood Actor R Madhavan Son Verdant Interview Viral Social Media Shadow Father

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top