Rajesh Khanna Death Anniversary: 17 वर्ष तिच्याशी अबोला! शेवटच्या क्षणी...

काही अभिनेत्यांची जादु ही चाहत्यांच्या मनातून कधीच पुसली जाऊ शकत नाही. त्या अभिनेत्यांच्या अनेक आठवणी त्यांच्या मनात नेहमीच ताज्या असतात.
Rajesh Khanna Death Anniversary
Rajesh Khanna Death Anniversaryesakal

Rajesh Khanna News: काही अभिनेत्यांची जादु ही चाहत्यांच्या मनातून कधीच पुसली जाऊ शकत नाही. त्या अभिनेत्यांच्या अनेक आठवणी त्यांच्या मनात नेहमीच ताज्या असतात. बॉलीवूडमधील एक अभिनेता तर असा होता की, तो (Bollywood Actor) आजही त्याच्या चित्रपट आणि अभिनयामुळे चाहत्यांच्या हदयात आहे. त्याचे नाव राजेश खन्ना त्यांना काका या टोपणनावानं ओळखलं (Nick Name Kaka) जायचं बॉलीवूडचे पहिले सुपरस्टार म्हणजे राजेश खन्ना, लागोपाठ दहापेक्षा अधिक चित्रपट ब्लॉकबस्टर ठरण्याचं त्यांचं रेकॉर्ड अद्याप अबाधित असल्याचे सांगण्यात येते.

बॉलीवूडचे पहिले मेगास्टार असणाऱ्या राजेश खन्ना यांनी आपल्या अनोख्या स्टाईलनं चाहत्यांना वेड लावले. त्यांचं दिसणं, पडद्यावर वावरणं हे सारं भुलवून (Bollywood Actress) टाकणारं होतं. युवतीच्या विशेष पसंतीचे असणाऱ्या राजेश खन्ना यांना अमाप लोकप्रियता मिळाली होती.. 1966 मध्ये प्रदर्शित झालेल्या आखरी खत पासून त्यांच्या प्रवासाला सुरुवात झाली होती. त्यानंतर त्यांनी आनंद, आराधना, अमर प्रेम, कटी पतंग, बावर्ची, आप की कसम, इत्तेफाक, हाथी मेरे साथी, अनुरोध, अंदाज सारख्या चित्रपटांनी प्रेक्षकांच्या मनात स्थान मिळवले.

18 जुलै 2012 रोजी राजेश खन्ना यांनी अखेरचा श्वास घेतला. आज त्यांच्या निधनाला नऊ वर्षे पूर्ण झाली आहेत. मात्र ते अजुनही चाहत्यांच्या मनात जिवंत आहेत. 70 आणि 80 च्या दशकांतील सगळ्यात नावाजलेले अभिनेते म्हणून राजेश खन्ना यांच्याकडे पाहिले जाते. त्यांनी 1973 मध्ये डिंपल कपाडियासोबत लग्न केले. मात्र त्यांचे लग्न हे काही फार काळ टिकलं नाही. अकरा वर्षानंतर त्यांनी एकमेकांपासून वेगळं होणं पसंत केलं. 1984 मध्ये ते वेगळे झाले. डिंपल पूर्वी राजेश खन्ना हे अंजु महेंदु या अभिनेत्रीसोबत रिलेशनशिपमध्ये होते. त्यांना तिच्याशी लग्न करायचे होते. मात्र अंजुला ते मान्य नव्हते.

Rajesh Khanna Death Anniversary
Twinkle Khanna: नाही तर तुम्हालाही होईल हा रोग, ट्विंकलनं चाहत्यांना सुनावलं

अंजुनं नकार दिल्यानं राजेश खन्ना हे नाराज झाले होते. 17 वर्षे ते एकमेकांशी बोलले देखील नाही. राजेश खन्ना यांच्या निवर्तण्यापूर्वी त्यांचे नाते सुरळीत झाले होते. त्यावेळी अंजु यांनी राजेश खन्ना यांची काळजी घेतली होती. जेव्हा त्यांनी अखेरचा श्वास घेतला त्यावेळी त्यांचा हात माझ्या हातात होता. याचे मला मोठे समाधान असल्याचे अंजु यांनी सांगितले होते.

Rajesh Khanna Death Anniversary
'आती क्या खंडाला'वर आमिर खानने नीतू कपूरबरोबर केला डान्स, पाहा Video

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com