रवि किशन यांच्या आईला कॅन्सर, मुंबईत उपचार सुरु

भोजपूरी मनोरंजन क्षेत्रातील प्रसिद्ध अभिनेता म्हणून रवि किशन परिचित आहे.
Ravi kishan news
Ravi kishan news esakal

Bollywood News: भोजपूरी मनोरंजन क्षेत्रातील प्रसिद्ध अभिनेता म्हणून रवि किशन परिचित आहे. त्यांनी बॉलीवू़डमध्ये देखील आपल्या अभिनयाचा ठसा उमटविला आहे. गेल्या काही दिवसांपासून रवि किशन अस्वस्थ आहे. त्याला (Ravi Kishan) कारण म्हणजे त्यांच्या आईला झालेला कॅन्सर. त्यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेयर करुन यासंबंधी माहिती दिली आहे. ही बातमी ऐकताच रवि (Cancer News) किशन यांच्या चाहत्यांनाही मोठा धक्का बसला आहे. काही (Social media news) महिन्यांपूर्वीच त्यांच्या भावाचे निधन झाल्यानं त्यांच्या कुटूंबावर दु:खाचा डोंगर कोसळला होता. आणि आता आईला कॅन्सल झाल्यानं ते अधिक व्यथित झाले आहे. पोस्ट शेयर करुन त्यांनी चाहत्यांना आईच्या प्रकृतीसाठी आवाहन केले आहे.

मुंबईतील टाटा कॅन्सर रुग्णालयामध्ये रवि किशन यांच्या मातोश्रीवर उपचार सुरु आहेत. सोशल मीडियावर शेयर केलेल्या पोस्टमध्ये रवि किशन यांनी म्हटले आहे की, गेल्या काही महिन्यांपासून मला मोठ्या प्रसंगांचा सामना करावा लागत आहे. भावाचे निधन झाल्यानं मी खचून गेलो होतो. आणि आता आईला कॅन्सरचे निदान झाले आहे. त्यामुळे चिंतेत आणखी भर पडली आहे. तिच्यावर मुंबईतील रुग्णालयात उपचार सुरु आहेत. त्या जीवघेण्या आजारातून त्या बऱ्या व्हाव्यात यासाठी मी देवाकडे प्रार्थना करतो आहे. महादेवाला मी त्यासाठी साकडे घातले आहे.

Ravi kishan news
Photo viral - तारक मेहतामधील बाबुलालच्या मुलीचं लग्न, चर्चा तर होणारच!

रवि किशन यांच्या भावाचे 30 मार्च रोजी दिल्लीतील एका बड्या रुग्णालयात निधन झाले होते. त्याची माहिती त्यांनी सोशल मीडियावरुन दिली होती. सततच्या कौटूंबिक संघर्षानं आपण व्यथित झाल्याचे त्यांनी सांगितले होते. चाहत्यांनी रवि किशन यांना सोशल मीडियावरुन मानसिक आधार देत त्यांच्या मातोश्रीसाठी देवाकडे प्रार्थना केली आहे. त्या लवकर आजारातून बऱ्या होतील असे म्हणत त्यांना दिलासा दिला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com