
असशील विश्वसुंदरी म्हणून काय झालं! मेकअप वरुन ऐश्वर्या पुन्हा ट्रोल
Bollywood News: बॉलीवूडची लावण्यसम्राज्ञी म्हणून जिच्या नावाचा नेहमीच उल्लेख केला जातो अशा ऐश्वर्याची सोशल मीडियावर चर्चा असते. सध्या ती एका (Cannes Film Festival 2022) वेगळ्या कारणासाठी ट्रोल होत आहे. याचे कारण म्हणजे तिचा मेक अप. ऐश्वर्या ही गेल्या काही वर्षांपासून कान्स या जगप्रसिद्ध (bollywood actress) चित्रपट महोत्सवामध्ये सहभागी होत आहे. सोशल मीडियावरील तिच्या त्या सोहळ्यातील फोटोंना चाहत्यांचा मोठा प्रतिसाद मिळाला आहे. यंदाच्या कान्स महोत्सवामध्ये ऐश्वर्या वेगवेगळ्या कारणासाठी ट्रोल झाली (social media) होती. केवळ तिच नाहीतर तिचा पती प्रसिद्ध अभिनेता अभिषेक बच्चन देखील ट्रोल झाला होता. यावेळी त्यांची मुलगी आराध्या ही देखील कान्समध्ये सहभागी झाली होती.
ऐश्वर्याला तिच्या दिसण्यावरुन नेटकऱ्यांनी ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे. कान्समध्ये तुम्ही काही हटके कराल तेव्हाच तुमची प्रसिद्धी होते असे म्हटले जाते. त्यानुसार ऐश्वर्यानं त्यावरुन प्रेक्षकांचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला होता. त्यामुळे ऐश्वर्या सोशल मीडियावर नेटकऱ्यांच्या रडारवर होती. आताही तिनं जो मेक अप केला आहे त्यामुळे तिला नेटकऱ्यांच्या टीकेला सामोरं जावं लागलं आहे. अशाप्रकारे नेटकऱ्यांच्या रोषाला सामोरं जावं लागणे हे काही ऐश्वर्याच्या बाबत पहिल्यांदाच घडलेलं नाही. यापूर्वी देखील तिला तिच्या लूक्समुळे चाहत्यांच्या अर्वाच्य प्रतिक्रियांचा सामना करावा लागला होता.
हेही वाचा: Cannes 2022: लाल रिबिनीने दोन वेण्या बांधलेल्या सुनिल ग्रोव्हरला पाहिलंत?
सध्या ऐश्वर्या सोशल मीडियावर ट्रेडिंगचा विषय आहे. त्याला कारणही तसचं आहे. कान्समध्ये तिचा जो लूक होता त्याची चर्चा सगळीकडे आहे. त्यावरुन तिला नेटकऱ्यांनी चांगलेच झापले आहे. कान्समधल्या एका इव्हेंटमध्ये ऐश्वर्या गेली होती. त्याचे फोटो तिनं सोशल मीडियावर व्हायरल केले होते. यावेळी तिला नेटकऱ्यांनी तिचा स्टायलिस्ट बदलावा असा सल्ला दिला आहे. काहींनी तर तू असशील विश्वसुंदरी पण म्हणून तुझा असा मेक अप आम्ही का सहन करायचा असा रोखठोक सवालही नेटकऱ्यांनी ऐश्वर्याला विचारला आहे.
हेही वाचा: Cannes वरुन परत येताच अभिषेकला मिळाली वाईट बातमी,सोशल मीडियावर झाला व्यक्त
Web Title: Bollywood Actress Aishwarya Rai Trolled Cannes Film Festival 2022 Make Up Sense Comment
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..