'शेजारच्यांकडून कळलं मला': रितेशच्या लग्नावर आईची प्रतिक्रिया

बिग बॉसमध्ये (Bigg Boss 15) प्रचंड लोकप्रियता मिळवणारी अभिनेत्री राखी सावंत (Rakhi Sawant) ही नेहमीच तिच्या हटकेपणासाठी ओळखली जाते.
ritesh and rakhi sawant
ritesh and rakhi sawant

मुंबई - बिग बॉसमध्ये (Bigg Boss 15) प्रचंड लोकप्रियता मिळवणारी अभिनेत्री राखी सावंत (Rakhi Sawant) ही नेहमीच तिच्या हटकेपणासाठी ओळखली जाते. बिग बॉसमध्ये सर्वाधिक चर्चेत असणारी स्पर्धक म्हणूनही राखीचं नाव घेतलं जातं. तिला आणि तिच्या पतीला रितेशला (Ritesh) बिग बॉसमध्ये वाईल्ड कार्डव्दारे एंट्री मिळाली होती. त्यामुळे चाहत्यांनाही प्रश्न पडला होता. तो म्हणजे राखीनं लग्न केव्हा केलं. बिग बॉसमध्ये राखी तिच्या पती रितेश समवेत दिसत आहे. वास्तविक रितेशचे पहिले लग्नही झाले आहे. त्याच्या पत्नीनं काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावरुन एक व्हिडिओ देखील शेयर केला होता. आता रितेशच्या आईनं या लग्नावर आपली प्रतिक्रिया दिली आहे.

रितेशच्या आईचं म्हणणं आहे की, मला त्या लग्नाबाबत काहीही कल्पना नव्हती. शेजारच्यांनी त्याविषयी सांगितलं. मी अजून तर त्याला भेटली देखील नाही. त्यामुळे मला तर त्याच्याविषयी काहीही माहिती देखील नाही. यावेळी रितेशच्या आईनं रितेशच्या पहिल्या लग्नाचा उल्लेखही केला. त्यांनी सांगितलं की, रितेशचं पहिलं लग्न झालं होतं. त्याची पत्नी त्याला सोडून राहते आहे. रितेशनं तिला मारहाण केल्यानंतर सोडल्याचेही मी ऐकले आहे. पण आता राखीनं त्याच्याशी लग्न केलं आहे. अजून त्याची भेट नाही. त्याला ती पसंत होती त्यामुळे त्यानं लग्न केलं असं सांगता येईल.

ritesh and rakhi sawant
प्रियंका हॉलीवूडमध्ये मग्न अनं जोनास भावोजींना बॉलीवूडचे स्वप्न!

रितेशच्या आईनं जी प्रतिक्रिया दिली आहे त्याची चर्चा आहे. रितेशच्या आईला राखी फारशी पसंत नसल्याचे दिसून आले आहे. त्यानं आता तिच्याशी लग्न केलं आहे. त्याची आवड आपल्याला शेजारच्यांनी सांगितली. गेल्या काही दिवसांपासून राखी आणि तिचा पती बिग बॉसच्या सीझनमध्ये चर्चेतील चेहरा आहे. यापूर्वी अभिजित बिचुकलेनं राखीच्या पतीला अपशब्द वापरले होते. त्यामुळे राखीनं त्याच्यावर नाराजी व्यक्त केली होती. यावेळी ती भलतीच आक्रमक झाली होती. त्याचा व्हिडिओही व्हायरल झाला होता. त्यावर नेटकऱ्यांनी वेगवेगळ्या प्रकारच्या प्रतिक्रियाही दिल्या होत्या. आता रितेशच्या आईनं दिलेल्या प्रतिक्रेयमध्ये असं म्हटलं आहे की, मला तर त्या लग्नाची कल्पना शेजारच्यांनी दिली होती. याविषयी मला काहीही माहिती नव्हते.

ritesh and rakhi sawant
बिग बॉस १४: सलमान खानच्या विकेंडच्या वारमध्ये राखी सावंत आणि कश्मिरा शाह एकमेकींना भिडल्या

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com