
Video Viral: 'बुरखा' घालून नोराच्या गाण्यावर 'मायलेकींचा' डान्स
Nora Fatehi: जगभरामध्ये नोराचे चाहते (bollywood actress Nora Fatehi) आहेत. तिच्या डान्सला मिळणारा प्रतिसाद मोठा आहे. जेव्हा नोराचा एखादा डान्स सोशल मीडियावर (Nora Fatehi Dance Viral On Social Media) व्हायरल होतो तेव्हा त्या व्हिडिओला मिळणारा प्रतिसाद देखील लाखोंच्या घरात असल्याचे दिसून आले आहे. सध्या सोशल मीडियावर नोराच्या एका गाण्यावर डान्स करत असलेल्या महिलेचा आणि तिच्या मुलीचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. त्यामध्ये त्या महिलेनं बुरखा घालून डान्स केला आहे. तिच्या त्या डान्सला आतापर्यत पाच लाखांहून अधिक Likes मिळाले आहेत. अनेकांनी तिला वेगवेगळ्या प्रकारच्या कमेंट्स देखील केल्या आहेत.
दिलबर(Dilber), नाच मेरी राणी (Naach Meri Rani), यासारख्या गाण्यांवर नोरानं केलेल्या डान्सची नेहमीच चर्चा होत असते. सध्या प्रसिद्ध गायक गुरु रंधावा (Guru Randhawa) सोबत तिचं एक गाणं व्हायरल झालं आहे. डान्स मेरी राणी असं त्या गाण्याचं नाव आहे. त्या गाण्यावर नोरानं ज्या पद्धतीनं डान्स केला आहे, त्याचे चाहत्यांनी मोठ्या प्रमाणात कौतूक केलं आहे. त्याला चाहत्यांनी वेगवेगळ्या प्रकारच्या कमेंट्स देखील केल्या आहेत. आता एका महिलेनं बुरखा घालून नोराच्या गाण्यावर डान्स केला आहे. तो डान्स पाहून नोरानं तिचं कौतूक केलं आहे. आई आणि मुलगी यांनी अतिशय सुंदरपणे त्या गाण्यावर डान्स करत नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. आतापर्यत त्या गाण्याला लक्षावधी व्ह्युज मिळाले आहे.
हेही वाचा: Video: पोलिसांनी पोस्ट अॅशेस पार्टी केली बंद
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या त्या व्हिडिओला नेटकऱ्यांनी पसंत केले आहे. नोरानं जेव्हा तो डान्स पाहिला तेव्हा तिला आपल्या सोशल मीडिया अकाउंटवरुन तो व्हिडिओ शेयर करण्याचा मोह आवरला नाही. तिनं त्या मायलेकींना शुभेच्छा दिल्या आहेत. त्याचं कौतूकही केलं आहे. पाच लाख लाईक्स या व्हिडिओला मिळाले आहेत.
हेही वाचा: Viral Video: कुत्र्याला घाबरुन 'जंगलाचा राजा' गेला पळून
Web Title: Bollywood Actress Dancer Nora Fatehi Nach Meri Rani Song Dance Viral Mother Daughter
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..