'सुकेशपेक्षा बॉडीगार्ड भारी'!: जॅकलीन झाली पुन्हा ट्रोल | Bollywood Actress Jacquelin Fernandez bodyguard video | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

bollywood actress jacquelin fernandez
'सुकेशपेक्षा बॉडीगार्ड भारी'!: जॅकलीन झाली पुन्हा ट्रोल

'सुकेशपेक्षा बॉडीगार्ड भारी'!: जॅकलीन झाली पुन्हा ट्रोल

बॉलीवूडची स्टार अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिझ (bollywood actress jacquelin Fernandiz) सध्या चर्चेत आहे. मनीमाफिया सुकेश चंद्रशेखरसोबत (Money mafiya Sukesh chandrashekhar) तिचं नाव जोडलं गेलं होतं. त्याच्यासोबत तिचे फोटोही व्हायरल झाले होते. त्यावरुन तिला ट्रोल (Trolled on social media) करण्यात आले होते. यावर जॅकलीननं चाहत्यांना आवाहन केलं होतं की, त्या फोटोंना कमेंट देणं टाळा. गेल्या काही दिवसांपासून ईडीनं जॅकलीनची चौकशी सुरु केली आहे. श्रीलंकेत तिची आई आजारी असून तिला त्या देशात जाण्याची परवानगीही नाकारण्यात आली आहे. त्याचे कारण तिची सुरु असलेली चौकशी. आता जॅकलीनचा बॉडीगार्डसोबतचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. त्यामुळे तिला नेटकऱ्यांच्या ट्रोलिंगला सामोरं जावं लागलं आहे.

एकीकडे जॅकलीनच्या (actress jacquelin Fernandiz) काही फिल्म्स या प्रदर्शनासाठी तयार आहेत दुसरीकडे तिच्यावर ईडीची (Ed investigation) नजरही आहे. कोट्यवधी रुपयांचा अपहार करणाऱ्या सुकेश चंद्रशेखर सोबत जॅकलीनचं नाव जोडलं गेलं होतं. सुकेशकडून तिनं काही महागड्या वस्तुंचा स्वीकारही केला होता. तिच्या कुटूंबियांना देखील सुकेशनं पैसे दिल्याची बातमी सुत्रांनी दिली होती. यावरुन डोकेदुखी वाढलेल्या जॅकलीनचा सुकेशबरोबरचा तो फोटो व्हायरल झाला. आणि चर्चेला उधाण आलं. दोन दिवसांपासून त्यावर नेटकऱ्यांनी शेलक्या शब्दांत जॅकलीनला प्रतिक्रिया दिल्या आहेत. तसेच तिच्या नव्या व्हिडिओवरुनही टीका केली आहे.

हेही वाचा: Viral Video: कुत्र्याला घाबरुन 'जंगलाचा राजा' गेला पळून

पापाराझी विरल भयानीनं इंस्टावरुन जॅकलीनचा एक व्हिडिओ व्हायरल केला आहे. त्यामध्ये ती अनेक फोटोग्राफर्सच्या गराड्यात सापडल्याचे दिसून आले आहे. दुसरीकडे नेटकऱ्यांनी विरलाही ट्रोल केले आहे. तु आता जॅकलीनची प्रतिमा सुधारण्याचा प्रयत्न करतो आहेस. अशा प्रकारच्या प्रतिक्रिया त्याला नेटकऱ्यांनी दिल्या आहेत. त्यावेळी जॅकलीनसोबत तिचा बॉडीगार्डही आहे. त्यावर नेटकऱ्यांनी सुकेशपेक्षा तिचा बॉडीगार्ड भारी आहे. अशा शब्दांत जॅकलीनवर टीका केली आहे. दुसऱ्यानं लिहिलं आहे की, जॅकलीन सुकेश कुठे आहे..... जॅकलीननं मात्र चाहत्यांना आपल्याला विनाकारण ट्रोल करु नये असे आवाहन केले आहे.

हेही वाचा: 'कही ये वो तो नही' प्रसिद्ध अभिनेते अनुपम खेर यांचा Video Viral

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
loading image
go to top