भारत सोडून कुठेही जाता येणार नाही, कोर्टानं जॅकलीनला पुन्हा फटकारलं!

बॉलीवूडची प्रसिद्ध अभिनेत्री जॅकलीनच्या अडचणीत आणखी वाढ झाली आहे.
Bollywood Actress Jacqueline Fernandez
Bollywood Actress Jacqueline Fernandez esakal

Bollywood Actress: बॉलीवूडची प्रसिद्ध अभिनेत्री जॅकलीनच्या अडचणीत आणखी वाढ झाली आहे. तिनं काही दिवसांपूर्वी कोर्टाकडं तिच्या घरी श्रीलंकेत जाण्यासाठी (jacquelin Fernandez) कोर्टाकडं परवानगी मागितली होती. याशिवाय विदेशात (Bollywood News) चित्रिकरणासाठी कोर्टाकडे एक अर्जही केला होता. त्यावर कोर्टानं तिच्या अर्जाला केराची टोपली दाखवली आहे. गेल्या काही दिवसांपासून जॅकलीन वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. तिच्यामागे इडीचा ससेमिरा सुरु आहे. (Sukesh Chandrashekher) महाठग सुकेश चंद्रशेखरनं जो कोट्यवधी रुपयांचा घोटाळा केला त्या सुकेशची जवळची मैत्रीण म्हणून जॅकलीनचे नाव घेता येईल. सुकेश चंद्रशेखरनं तिला महागड्या भेटवस्तु दिल्याचीही चर्चा आहे. (Jacqueline Fernandez seeks permission to go abroad)

दिल्लीच्या पटियाला हाऊस कोर्टाकडे जॅकलीननं परदेशी जाण्यासाठी परवानगी मागितली होती. त्यावर कोर्टानं त्या अर्जावर सुनावणी पुढे ढकलली आहे. आपल्याला कामानिमित्त परदेशी जाण्यासाठी परवानगी द्यावी यासाठी कोर्टाकडं अर्ज करण्यात आला होता. कोर्टानं नकार दिल्यानं जॅकलीनच्या अडचणीत आणखी वाढ झाली आहे. सोशल मीडियावर सुकेश चंद्रशेखरसोबत जॅकलीनचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. ज्यावेळी ईडीनं सुकेशला अटक केली त्यानंतर काही दिवसांनी जॅकलीनला देखील चौकशीसाठी पोलिसांनी ताब्यात घेतले होते. तेव्हापासून तिच्या आगामी प्रोजेक्टवर टांगती तलवार आहे. काही निर्मात्यांकडून तिला वेळेत चित्रिकरण पूर्ण करण्याची ताकीदही देण्यात आली आहे.

Bollywood Actress Jacqueline Fernandez
'सुकेशपेक्षा बॉडीगार्ड भारी'!: जॅकलीन झाली पुन्हा ट्रोल

12 मे रोजी दुबईत होणाऱ्या एका कार्यक्रमासाठी जॅकलीनला जायचे होते. त्यावेळी तिनं कोर्टाकडे परवानगी मागितली होती. तेव्हा कोर्टानं दिला नकार दिला होता. त्यानंतर तिला शुटींगच्या निमित्तानं फ्रान्स आणि नेपाळला जायचे होते. त्यासाठी तिनं पुन्हा कोर्टाकडे अर्ज केला होता. त्यालाही कोर्टानं फेटाळून लावले. यामुळे येत्या काळात जॅकलीनला आणखी वेगवेगळ्या अडचणींना सामोरं जावं लागणार असल्याचं चित्र समोर आलं आहे. 200 कोटी रुपयांच्या गैरव्यवहार प्रकरणी अटकेत असलेल्या सुकेश चंद्रशेखरशी जॅकलीनची जवळीक असल्याचा आरोप तिच्यावर ठेवण्यात आला आहे.

Bollywood Actress Jacqueline Fernandez
जॅकलीन फर्नांडिसच्या लेटेस्ट फोटोंनी लावले चाहत्यांना वेड

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com