Kajol Covid Positive: काजलला कोरोना, न्यासासाठी खास पोस्ट...

काजलच्या त्या पोस्टनं तिच्या चाहत्यांनी लक्ष वेधून घेतलं आहे.
Actress Kajol And Nyasa
Actress Kajol And Nyasa

Kajol Devgan Covid Positive: बॉलीवूडमध्ये (Bollywood News) अनेक सेलिब्रेटी कोरोनाच्या जाळ्यात अडकल्याचे दिसून आले आहे. वर्षाची सुरुवात करण जोहर (Karan Johar) आणि करिना कपूर (Kareena Kapoor) यांच्यापासून झाली होती. करणकडे जी पार्टी होती त्यामध्ये सहभागी असलेल्या अनेकांना कोरोनाची लागण झाली होती. त्यामध्ये अमृता अरोराची देखील समावेश होता. आता प्रसिद्ध अभिनेत्री काजलला कोरोनाची लागण झाल्याची बातमी समोर आली आहे. गेल्या दोन दशकांहून अधिक काळ आपल्या अभिनयानं प्रेक्षकांची पसंती मिळवणाऱ्या अभिनेत्रींमध्ये काजलचं नाव घेतलं जातं. तिचा मोठा चाहतावर्ग आहे.

ओमीक्रॉन (Omicron) या कोरोनाच्या नव्या व्हेरियंटनं अनेकांची डोकेदुखी वाढवल्याचे दिसून आले आहे. आता पुन्हा एकदा बुस्टर डोस घ्यावा लागणार असेही केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून सांगण्यात आले आहे. त्यावर तातडीनं कार्यवाही सुरु करण्यात आली आहे. गेल्या कोरोनाच्या लाटेच्या तुलनेत ही लाट सौम्य स्वरुपाची असून मात्र त्यात जीवघेणे व्हेरियंट आढळून आल्याचे शास्त्रज्ञांनी सांगितलं आहे. आता बॉलीवूडच्या प्रख्यात अभिनेत्री काजलला कोरोना झाल्यानं तिच्या चाहत्यांनी काळजी व्यक्त केली आहे. तिला काळजी घेण्याची विनंती चाहत्यांनी केली आहे. आतापर्यत करिना कपूर ते स्वरा भास्करपर्यत अनेक सेलिब्रेटींना कोरोनाची लागण झाल्याचे दिसून आले आहे.

Actress Kajol And Nyasa
Video: वाईन मार्केटमध्ये उपलब्ध होणार हा निर्णय शेतकरी हिताचा -हसन मुश्रीफ

काजल सध्या घरीच विलगीकरणात असून तिला यावेळी तिची मुलगी न्यासाची आठवण येत असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे तिनं इंस्टावर न्यायासाठी एक गोष्ट शेयर केली आहे. त्या पोस्टमध्ये काजलनं लिहिलं आहे की, माझा कोरोनाचा रिपोर्ट आला असून त्यामध्ये मी पॉझिटिव्ह असल्याचे सांगण्यात आले आहे. तेव्हा गेल्या काही दिवसांपासून माझ्या संपर्कात असलेल्या व्य़क्तींनी त्यांची आरोग्य तपासणी करुन घ्यावी. आणि काळजी घ्यावी. असे आवाहनही तिनं केलं आहे. ग्लोबल आयकॉन प्रियंका चोप्रानं काजलला काळजी घेण्यास सांगितलं आहे. तिनं यांसंबंधी एक पोस्ट देखील शेयर केली आहे.

Actress Kajol And Nyasa
video: मीडियासमोरच राखीनं रितेशला केलं 'LipLock'

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com