esakal | 'काय ते ध्यान! चिंध्यासारखा ब्लाऊज घातला?' कंगनाने काढली दीपिकाची मापं

बोलून बातमी शोधा

bollywood actress kangana ranaut and director Soni Taraporevala target deepika padukone for new advertise}

कंगनाने अभिनेत्री दीपिका पादुकोणवर नाव न घेता तिच्यावर नुकतीच टिका केली आहे. दीपिका नुकतीच एका अंतरराष्ट्रीय जीन्स कंपनीची ब्रँड अम्बेसेडर झाली आहे. या ब्रँडची जाहिरात दिपीकाने सोशल मीडियावर शेअर केली.

'काय ते ध्यान! चिंध्यासारखा ब्लाऊज घातला?' कंगनाने काढली दीपिकाची मापं
sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

बॉलीवुडमधील प्रसिध्द अभिनेत्री कंगना राणावत नेहमीच काहीतरी वक्तव्य करत असते. सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असणारी कंगना तिचे बोल्ड स्टेटमेंन्ट आणि मते पोस्ट करत असते. सरकार विरोधी वक्तव्य असो वा बॉलीवुडमधील कलाकरांवरील टिका कंगना बिनधास्त तिची मत सोशल मीडियावर शेअर करते. ट्विटरच्या माध्यमातून कंगना आपली मत लोकांपर्यंत पोहचवते. अनेक वेळा तिच्या ट्विटमुळे तिला ट्रोल केले जाते. कंगनाच्या सोशल मीडियावरील वक्तव्यांमुळे ती नेहमी वादाच्या भोवऱ्यात अडकते.

कंगनाने अभिनेत्री दीपिका पादुकोणवर नाव न घेता तिच्यावर नुकतीच टिका केली आहे. दीपिका नुकतीच एका अंतरराष्ट्रीय जीन्स कंपनीची ब्रँड अम्बेसेडर झाली आहे. या ब्रँडची जाहिरात दिपीकाने सोशल मीडियावर शेअर केली. या जाहिरातीवर आता टिका होत आहेत. या प्रकरणात आता काँट्रवर्सी क्वीन कंगनाने उडी घेतली आहे. कंगनाने तिच्या ट्विटर अकांउटवर नाव न घेता दीपिकावर निशाणा साधला आहे.

जॉनी लिव्हर यांचा मुलांसोबत धमाल डान्स; नेटकरी पडले प्रेमात​

दीपिकाने तिन मुलींसोबत जीन्स आणि डेनिम जॉकेट घाललेले फोटो सोशल मीडियावर शेअर केले होते. या फोटोवर टिका करत कंगनाने एक ट्विट पोस्ट केले. कंगनाने या पोस्टमध्ये तीन महिलांचा जुन्या काळातील फोटो शेअर केला. या महिला भारत, जपान आणि सीरियाच्या असल्याची माहिती समोर आली आहे. कंगनाने या पोस्टमध्ये दिलेल्या माहितीनुसार, या महिलांनी 1885 साली हे फोटोशूट केलं होतं. ज्यामध्ये त्यांनी आपला पारंपरिक पोशाख परिधान केला आहे.

ओटीटी प्लॅटफॉर्मवर 'तसलं काही' नकोच; सर्वोच्च न्यायालय​

या ट्विटच्या माध्यमातून कंगनाने दीपिकाला ट्रोल करण्याचा प्रयत्न केला या ट्विटमध्ये जुन्या काळातील महिलांचं कंगनाने कौतूक करत लिहिले आहे की, 'या महिलांनी केवळ त्यांचं व्यक्तिमत्त्वच दर्शवलं नाही, तर संपूर्ण संस्कृतीचं आणि राष्ट्राचं प्रतिनिधित्व देखील केलं आहे. आजच्या जगात अशाप्रकारे यश मिळवणाऱ्या महिलांचे फोटो काढले जातात. ज्यामध्ये त्या फाटलेल्या अमेरिकन जीन्स आणि चिंध्याप्रमाणे ब्लाऊज परिधान करतात. या महिला अमेरिकन मार्केटिंगशिवाय इतर कशाचंही प्रतिनिधित्व करत नाहीत.'

कंगनाने या ट्विटमधून दीपिकाला ट्रोल करण्याचा प्रयत्न केला मात्र, या ट्विटनंतर अनेक नेटकऱ्यांनी कंगनालाच ट्रोल करायला सुरू केलं आहे.

जान्हवीचा 'रिमेक' ठरला हिट; सोशल मीडियावरं गाण व्हायरल​

प्रसिद्ध हॉलीवूड पटकथा लेखिका आणि 'ये बॅलेट' च्या दिग्दर्शका सोनी तारापोरेवाला यांनी  चोरीचा आरोप दीपिकावर केला आहे.  सोशल मीडियावर सोनी तारोपोरेवाला यांनी दीपिकाची जाहिरात पाहिली त्यानंतर त्यांनी एक पोस्ट शेअर केली आहे. ज्यामध्ये काही स्क्रीनशॉट्स आहेत. ही पोस्ट शेअर करताना सोनी यांनी लिहिलं की, 'काही दिवसांपूर्वी मी या जीन्सची जाहिरात पाहिली. या जाहिरातीत माझ्या 'ये बॅलेट' या चित्रपटाचा सेट पाहून मला धक्काच बसला आहे.' सोनी यांच्या या ट्विटनंतर दीपिका पदुकोणची नवीन जाहिरात वादाच्या भोवऱ्यात अडकली आहे.

- मनोरंजन विश्वातील बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by: Ashish N. Kadam)