धकधक गर्ल माधुरीचं 'मिस्टर डॉ.नेनेंना स्पेशल गिफ्ट'

बॉलीवूडमध्ये माधुरी दीक्षितचा जलवा अजूनही कायम आहे.
धकधक गर्ल माधुरीचं 'मिस्टर डॉ.नेनेंना स्पेशल गिफ्ट'

मुंबई - बॉलीवूडमध्ये माधुरी दीक्षितचा जलवा अजूनही कायम आहे. भलेही ती बॉलीवूडपासून दूर गेली असली तरी तिच्या लोकप्रियतेमध्ये कमी झालेली नाही. तिच्या चाहत्यांमध्ये तरुणाईची संख्या वाढली आहे. ती सध्या वेगवेगळ्या रियॅलिटी शो मध्ये परिक्षकाच्या भूमिकेत आहे. माधुरी नेहमीच सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांच्या संपर्कात असते. ती वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओ शेयर करुन चाहत्यांचे लक्ष वेधून घेताना दिसत आहे. सध्य़ा माधुरीचे पती डॉ.श्रीराम नेने यांचा जन्मदिनाच्या निमित्तानं तिनं शेयर केलेला व्हिडिओ व्हायरल झाला आहे. त्याला चाहत्यांनी लाईक्स आणि वेगवेगळ्या प्रकारच्या कमेंटही केल्या आहेत.

माधुरीच्या लग्नाचा आज 22 वा वाढदिवस आहे. त्यानिमित्तानं तिनं पती श्रीराम नेने यांना अनोख गिफ्ट दिलं आहे. त्याची चर्चा आहे. या औचित्यानं तिनं एक खास व्हिडिओ शेयर केला आहे. त्या व्हिडिओच्या माध्यमातून तिनं नेनेंना शुभेच्छा दिल्या आहेत. माधुरीनं दिल तो पागल है चित्रपटातील एका गाण्यावर डान्स केला आहे. त्या व्हिडिओला चाहत्यांनी मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद दिला आहे. त्या व्हिडिओमध्ये माधुरीनं काही फोटो शेयर केले आहे. गाण्याच्या साथीत फोटो आणि व्हिडिओ या कॉम्बिनेशनमध्ये तिनं शेयर केलेल्या त्या व्हिडिओची मोठी चर्चा आहे. त्या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये तिनं लिहिलं आहे की, ‘22 Magical years of togetherness' त्या पोस्टला चाहत्यांनी अभिनंदन आणि शुभेच्छाही दिल्या आहेत. त्या पोस्टला अर्जुन बिजलानी आणि राजा कुमारी यांनी देखील कमेंट दिल्या आहेत. त्या व्हिडिओला अडीच लाखांहून अधिक व्ह्युज मिळाले आहेत.

यासगळ्यात माधुरीच्या एका चाहत्यानं लिहिलं आहे की, बॉलीवूडमधील सर्वात बेस्ट जोडी. माधुरी दीक्षित आणि श्रीराम नेने यांचे 17 ऑक्टोबर 1999 मध्ये लग्न झाले. लग्नांतर ते अमेरिकेत स्थायिक झाले. गेल्या अनेक वर्षांपासून माधुरी अमेरिकेत स्थायिक आहे. तिला आरिन आणि रेयान नावाची दोन मुलं आहेत.

धकधक गर्ल माधुरीचं 'मिस्टर डॉ.नेनेंना स्पेशल गिफ्ट'
अस्सल मराठमोळं सौंदर्य; माधुरी दीक्षितच्या फोटोंवर चाहते घायाळ
धकधक गर्ल माधुरीचं 'मिस्टर डॉ.नेनेंना स्पेशल गिफ्ट'
माधुरी-रवीनामध्ये रंगली चुरस; 'अंखियों से गोली मारे' गाण्यावर केला जबरदस्त डान्स

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com