'तू तर आलियापेक्षा भारी'!, कौतूकानं राखी झाली भलतीच खूश!

बिग बॉसमध्ये तिनं आपल्या वागण्यामुळे चाहत्यांची पसंती मिळवली होती.
Rakhi Sawant
Rakhi Sawant esakal

Entertainment News: बिग बॉसमध्ये तिनं आपल्या वागण्यामुळे चाहत्यांची पसंती मिळवली होती. केवळ तिच्यामुळे त्या शोला मोठा टीआरपी (Bollywood News) मिळाला होता. अशी राखी सावंत सोशल मीडियावर(Social Media news) नेहमीच वेगवेगळ्या कारणांसाठी चर्चेत असते. आताही ती आलियाच्या गंगुबाईमुळे चर्चेत आली आहे. संजय लीला भन्साळी दिग्दर्शित गंगुबाई काठियावाडी (Gangubai Kathiyawadi Movie) हा चित्रपट दोन आठवड्यांपूर्वी प्रदर्शित झाला होता. त्याला प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळाल्याचे दिसून आले आहे. बॉक्स ऑफिसवर त्याला मोठं यशही मिळालं आहे. यासगळ्यात राखी सावंतनं गंगुबाईचा लूक करुन नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. राखीच्या त्या लूकवर नेटकऱ्यांनी भन्नाट प्रतिक्रिया दिल्या आहेत.

जाणकार प्रेक्षक, चाहते, अभ्यासक यांनी आलियाच्या भूमिकेचे कौतूक केले आहे. आलियाच्या वाट्याला गंगुबाईनं अमाप लोकप्रियता दिली आहे. या चित्रपटाचा ट्रेलर व्हायरल झाल्यापासून आलियाच्या नावाची चर्चा होती. सुरुवातीला अनेकांनी हा चित्रपट फारसा चालणार नाही. अशाप्रकारच्या प्रतिक्रिया दिल्या होत्या. मात्र आलियाच्या गंगुबाईनं मोठं यश मिळवलं आहे. आता आलियाची नक्कल करत राखीनं वेगळीच क्रेझ तयार केली आहे. तिनं गंगुबाईचा लूक करुन तो व्हायरल केला आहे. तो आता नेटकऱ्यांची पसंती मिळवताना दिसत आहे.

Rakhi Sawant
Gangubai Kathiawadi: पहिल्याच दिवशी 10 कोटींची कमाई

यापूर्वी राखीनं आलियाची तोंडभरून स्तुती केली आहे. तिच्या अभिनयाचे कौतूक केले आहे. आता राखीनं आलियाच्या भूमिकेतून नेटकऱ्यांचे मनोरंजन केले आहे. त्यासंबंधी एक व्हिडिओही शेयर केला आहे. राखीनं इंस्टावरुन हा व्हिडिओ शेयर केला आहे. त्यामध्ये ती आलियासारखी डान्स करताना दिसत आहे. दुसरीकडे आलियानं ज्याप्रकारे संवाद म्हटले आहे, तशाच प्रकारे संवाद म्हणताना दिसत आहे. यावर नेटकऱ्यांनी राखीचं कौतूक केलं आहे. तू तर एकदम आलियासारखीच दिसते. अशाप्रकारची प्रतिक्रिया दिली आहे.

Rakhi Sawant
बेसन, मोतीचुराच्या लाडवाची लावली वाट! मिल्कशेकचा Video Viral

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com