6 वर्ष का राहावं लागलं लांब?: सैफच्या बहिणीनं सांगितलं कारण | soha ali khan statement | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

soha ali khan statement
6 वर्ष का राहावं लागलं लांब?: सैफच्या बहिणीनं सांगितलं कारण

6 वर्ष का राहावं लागलं लांब?: सैफच्या बहिणीनं सांगितलं कारण

बॉलीवूडपासून (Bollywood actress) आपण जवळपास सहा वर्षे लांब का राहिलो याचा धक्कादायक खुलासा प्रख्यात अभिनेता सैफ अली खानची (bollywood actor saif ali khan) बहिण अभिनेत्री सोहा अली खाननं (Bollywood Soha Ali khan) केला आहे. आपल्या वेगळ्या शैलीतील अभिनयामुळे सोहा काही काळ बॉलीवूडमध्ये चर्चेत आली. मात्र तिला तिचा वेगळा असा ठसा उमटवता आला नाही. त्यामुळे ती ज्या वेगानं बॉलीवूडमध्ये आली त्याच वेगानं ती निघूनही गेली. मात्र बॉलीवूडपासून तिनं जाणीवपूर्वक लांब राहणं पसंत केलं. त्यामागील खास कारणाविषयी तिनं आता एका मुलाखतीमध्ये सांगितलं आहे. (soha ali khan statement on why she keep away from bollywood)

सोहा अली खान (Soha Ali Khan) ही जवळपास सहा वर्षे बॉलीवूडपासून लांब राहिली. आता ती कौन बनेगा शिखरवतीमध्ये (Kon Banega Shikharvati) बऱ्याच काळानंतर दिसणार आहे. पीटीआयनं (PTI) घेतलेल्या एका मुलाखतीमध्ये सोहानं काही वेगळ्या गोष्टींचा खुलासा केला आहे. मला आता पुन्हा अभिनयाच्या क्षेत्रात परतायचे आहे. मात्र काही जबाबदारी आहे. मी आता एक आई आहे. अभिनेत्री आहे, अशा वेगवेगळ्या प्रकारच्या भूमिकेत वावरत आहे. त्यामुळे मला त्याबाबत विशेष काळजी घ्यावी लागत आहे. वास्तविक या दोन्ही भूमिका करणे अवघड आहे. ते करताना मला तारेवरची कसरत करावी लागत आहे. काही करुन कुटूंबाला वेळ देणं ही माझ्यासाठी प्रायोरिटी होती. त्यापेक्षा दुसरं महत्व कशालाही नाही. असं मला वाटायचं. त्यामुळे बॉलीवूडपासून लांब जावं लागलं होतं.

हेही वाचा: Happy Birthday Kareena : जाणून घ्या तिच्याविषयी काही इंटरेस्टिंग फॅक्टस्

सोहानं (Soha Ali Khan) सांगितलं की, लोकं नेहमी मला एक प्रश्न विचारतात की, तुम्ही घराबाहेर का पडत नाहीत. काही काम का करत नाही... पुस्तकाचे लिखाण का करत नाही? मात्र त्यांना मी काय उत्तर देऊ हा मोठा प्रश्न आहे. सध्याच्या घडीला मी फारच व्यस्त आहे. त्यामुळे मला अभिनेत्री होण्यासाठी ज्या गोष्टींवर लक्ष केंद्रीत करणं महत्वाचं वाटतं त्याकडे पुरेशा प्रमाणात लक्ष देता येत नाही. जेव्हा लॉकडाऊन झाला होता तेव्हा मी आनंदात यासाठी होते की, मला कुटूंबाला वेळ देता येत होता. मात्र आता घराबाहेर पडलं पाहिजे याची जाणीव झाली आहे. मी आनंदी आहे की मला कौन बनेगा शिखरवती या सीरिजमध्ये काम करण्याची संधी मिळाली.

हेही वाचा: यंदाच्या वर्षी या बॉलीवूड (Bollywood) सेलिब्रेटींच्या घरात हलला पाळणा...

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
loading image
go to top