'भाजपाचे आमदार अज्ञानी, अशिक्षित' सोनम कपूरची मुनगंटीवारांवर टीका

बॉलीवूडची (bollywood) प्रख्यात अभिनेत्री सोनम कपूर (sonam kapoor) ही तिच्या वेगवेगळ्या कारणांसाठी चर्चेत असते.
sonam kapoor
sonam kapoor

बॉलीवूडची (bollywood) प्रख्यात अभिनेत्री सोनम कपूर (sonam kapoor) ही तिच्या वेगवेगळ्या कारणांसाठी चर्चेत असते. आताही तिनं जे वक्तव्य केलं आहे त्यामुळे तिच्यावर नेटकऱ्यांनी टीकाही केली आहे. तिनं भाजपच्या (bjp mla) आमदारांवर टीका केली आहे. भाजपाचे नेते सुधीर मुनगंटीवार (sudhir mungantiwar) यांच्यावर सोनमनं टीका केली आहे. तिनं त्यांना अज्ञानी आणि अशिक्षित आहात का....असा प्रश्न देखील विचारला आहे. त्यामुळे चर्चेत आलेल्या सोनमवर अनेकांनी टीका करण्यास सुरुवात केली आहे. यापूर्वी देखील सोनमनं राजकीय, सामाजिक स्वरुपाची वक्तव्ये करुन सोशल मीडियावरुन प्रसिद्धी मिळवल्याचे दिसून आले आहे.

सोनमनं आपलं मत व्यक्त करताना असं म्हटलं आहे की, मुनगंटीवार यांनी एलजीबीटीक्यु समुदायाच्या भावना दुखावल्या आहेत. त्यामुळे त्यांच्याप्रती नाराजी आहे. काही दिवसांपूर्वी मुनगंटीवार यांनी त्या समुदायाबद्दल धक्कादायक विधान केल्याचे दिसून आले होते. त्यामुळे वेगवेगळ्या प्रकारच्या प्रतिक्रिया देखील व्यक्त करण्यात आल्या होत्या. आता देखील सोनम कपूरनं सोशल मीडियाच्या माध्यमातून आपलं परखड मत व्यक्त मुनगंटीवारावर निशाणा साधला आहे.

sonam kapoor
Movie Review; प्रेक्षकांच्या भावनेचा बाजार मांडणाऱ्या चॅनेलचा 'धमाका'

सोनमनं तिच्या पोस्टव्दारे लिहिलं आहे की, अज्ञानी, अशिक्षित अशापद्धतीचं वक्तव्य करण्यात आलं याचं वाईट वाटतं. सोशल मीडियावरुन सोनमनं जी पोस्ट शेयर केली आहे त्यावरुन तिला नेटकऱ्यांचा प्रतिसादही मिळाला आहे आणि तिच्यावर टीका देखील करण्यात आली आहे. त्याचं झालं असं की, विधानसभेमध्ये लोक विश्वविद्यालय अधिनियम 2016 च्या बिलाची चर्चा सुरु होती. त्या बिलमध्ये विश्वविद्यालयामध्ये एलजीबीटीक्युच्या व्यक्तींना सहभागी करुन घेण्याची मागणी करण्यात आली होती. त्या बिलावर चर्चा करताना सुधीर मुनगंटीवार यांनी एलजीबीटीक्यु समुदायावर आक्षेपार्ह वक्तव्य केलं आहे. त्यामुळे ते चर्चेत आले आहे. मुनगंटीवार म्हणाले होते की, तुम्ही एलजीबीटीच्या लोकांना या विश्वविद्यालयामध्ये प्रवेश देणार आहात का, त्यांना त्याचे सदस्यत्व दिले जाणार आहे का, त्यासाठी कुठली समिती नेमणार आहात की नाही...असा सवाल मुनगंटीवार यांनी उपस्थित केला होता.

sonam kapoor
Movie Review : 'डार्लिंग' प्रेमाचा त्रिकोण

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com