तुला विमानतळावर एन्ट्री मिळालीच कशी?, काय तुझे कपडे; चाहते नाराज | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

तुला विमानतळावर एन्ट्री मिळालीच कशी?, काय तुझे कपडे; चाहते नाराज
तुला विमानतळावर एन्ट्री मिळालीच कशी?, काय तुझे कपडे; चाहते नाराज

तुला विमानतळावर एन्ट्री मिळालीच कशी?, काय तुझे कपडे; चाहते नाराज

मुंबई - आपल्या आगळ्या वेगळ्या फॅशनसाठी नेहमी चर्चेत असणारी अभिनेत्री म्हणजे उर्फी जावेद. सोशल मीडियावर ती फॅशन सेन्सेशन म्हणून लोकप्रिय आहे. गेल्या काही दिवसांपासून तिनं वेगवेगळ्या प्रकारचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केले आहेत. त्याला चाहत्यांचा मोठा प्रतिसादही मिळाला आहे. आता ती चर्चेत आली आहे त्याला कारण म्हणजे तिनं विमानतळावर शेयर केलेल्या एका व्हि़डिओमुळे. अर्थात तिचा तो व्हिडिओ एकानं शेयर केला आहे. मात्र उर्फीच्या चाहत्यांना तो व्हिडिओ आणि त्यामध्ये तिनं केलेला मेकअप अजिबात आव़डलेला नाही. त्यामुळे त्यांनी तिला ट्रोल केले आहे.

उर्फीला काही फोटोग्राफरनं विमानतळावर स्पॉट केले त्यावेळी तिनं ब्लॅक कलरचा टॉप परिधान केल्याचे दिसून आले. मात्र तो ड्रेस इतका अजब होता की, त्यामुळे तिला ट्रोलिंगचा सामना करावा लागला आहे. टीव्ही अभिनेत्री आणि बिग बॉसमधून लोकप्रिय झालेल्या उर्फीचा चाहतावर्ग मोठा आहे. मनोरंजन विश्वामध्ये ती आपल्या हटके फॅशनसाठी ओळखली जाते. तिला तिच्या फॅशनेबलसाठी मोठ्या प्रमाणावर लाईमलाईट मिळत असल्याचेही दिसून आले आहे. जेव्हा ती बिग बॉसमधून बाहेर आली तेव्हापासून चाहत्यांच्या पसंतीचा विषय ठरली आहे. उर्फी वेगवेगळ्या प्रकारची वेषभूषा करताना दिसून येते त्यामुळे तिला अनेकदा चाहत्यांच्या आणि नेटकऱ्यांच्या रोषालाही सामोरं जावं लागल्याचे दिसून आले आहे.

ज्यावेळी उर्फीला एअरपोर्टवर स्पॉट करण्यात आले त्यावेळी अनेक फोटोग्राफर्सनं तिचे फोटो टिपले. ते फोटो जेव्हा सोशल मीडियावर व्हायरल झाले त्यावेळी चाहत्यांनी तिला नावं ठेवली आहे. अशा कपड्यांमध्ये उर्फीला इंट्री मिळालीच कशी असा प्रश्न त्यांनी विचारला आहे. तसेच काही जणांनी हे असे कसे कपडे तिनं परिधान केले आहेत असं तिला विचारले आहे. एकानं लिहिलं आहे की, हा नेमका काय प्रकार आहे, ही नेहमी असे कपडे का घालते.....असा सवाल तिला विचारला आहे.

हेही वाचा: Movie Review; 'जय भीम' सणसणीत 'चपराक'

हेही वाचा: तिसऱ्या लग्नासाठी आमिर खान तयार; कोण आहे ती अभिनेत्री?

loading image
go to top