अजय देवगण Vs किच्चा सुदीप: राष्ट्रभाषेवरून जुंपली, सिंघमनं फटकारले

सिंघमनं टॉलीवूडच्या किच्चा सुदीपला फटकारले, तुम्ही आता...
ajay and sudeep kicha
ajay and sudeep kichaesakal

Bollywood Movie: बॉलीवूडचा प्रसिद्ध अभिनेता अजय देवगण (Ajay Devgn) आणि किच्चा सुदीप (Kiccha Sudeep) यांच्यात जोरदार वाद झाल्याचे दिसून आले आहे. त्याचं महत्वाचं कारण म्हणजे आपली राष्ट्रीय भाषा हिंदी (National Language Hindi) असल्याचे किच्चा सुदीपनं सांगितलं होतं. त्यावरुन अजयनं त्याला चांगलेच फैलावर घेतलं आहे. त्याला आपल्या अंदाजात समजावूनही (bollywood News) सांगितलं आहे. सध्या सोशल मीडियावरुन त्याची चर्चा सुरु झाली. अजयनं सोशल मीडियावरुन एक पोस्ट शेयर केली आहे. अजयनं सुदीपचा चांगलाच समाचार घेतला आहे. सुदीपला अजयनं दिलेल्या उत्तराची सोशल मीडियावर नेटकऱ्यांनी दखल घेतली आहे. तुम्ही जर हिंदीला तुमची राष्ट्रभाषा मानत नाही तर मग हिंदीमध्ये त्याचे डबिंग का करता असा प्रश्न अजयनं सुदीपला विचारला आहे. हिंदी ही आपली मातृभाषा आणि राष्ट्रभाषा आहे, नेहमीच राहिल...जन गण मन अशा शब्दांत अजयनं सुदीपला ठणकावले आहे.

यापूर्वी किच्चा सुदीपनं एका मुलाखतीमध्ये राष्ट्रीय भाषेवर वादग्रस्त विधान केले होते. त्याच्या त्या विधानाला सोशल मीडियावरुन चांगलीच प्रसिद्धी मिळाली होती. अनेकांनी त्याच्या बोलण्याला वेगळ्याच स्तरावर नेऊन ठेवले. त्यावेळी त्यानं केजीएफ चॅप्टर 2 च्या यशस्वी होण्याबद्दल वक्तव्य केलं होतं. त्यामध्ये हिंदी राष्ट्रभाषा नाही. असं किच्चा सुदीप म्हणाला होता. त्यावर अजय देवगणनं प्रतिक्रिया दिली आहे. अजयनं प्रतिक्रिया देताना सुदीपला चांगलेच सुनावले आहे. त्यानं यावेळी सुदीपला एक प्रश्नही विचारला आहे. त्यामध्ये तो म्हणतो, बॉलीवूड देखील आज पॅन इंडिया अंतर्गत चित्रपट तयार करतो. मात्र त्याला फारसा प्रतिसाद मिळालेला नाही. त्यामुळे त्यांनी आता तमिळ, तेलुगू चित्रपटांची डबिंग सुरु केलं आहे. आम्ही जे चित्रपट तयार केले आहेत त्याला सगळीकडून प्रतिसाद मिळाल्याचे दिसून आले आहे.

ajay and sudeep kicha
Video Viral: 'चंद्रमुखी’ मध्ये रंगणार 'अमृता- प्राजक्ताची' जुगलबंदी

किच्चाचं बोलणं सोशल मीडियावर व्हायरल झाल्याचे दिसून आले आहे. त्याचे झाले असे, अजय देवगण हा सध्या रनवे 34 च्या प्रचारात व्यस्त आहे. त्याचवेळी त्यात रकुल प्रीत सिंग आणि अमिताभ बच्चन यांच्या प्रमुख भूमिका आहेत. अजयनं यापूर्वी राजामौली यांच्या आरआरआरमद्ये काम केलं होतं. त्यात त्याच्या छोट्याशा भूमिकेला प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळाल्याचे दिसून आले होते. यासगळ्यात अजयनं सुदीपला चांगलेच सुनावले आहे. जर तुम्हाला हिंदी भाषेबाबत एवढा राग असेल तर तुमचे चित्रपट हिंदी भाषेत का डब करता, असा सवाल अजयनं विचारला आहे.

ajay and sudeep kicha
Video Viral: रणबीर-आलियाचा लग्नातील 'वरमाला समारंभ' पाहिलात का?

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com