'समंथा हॉस्पिटलमध्ये दाखल झालीच नाही,ती तर... ', आजारी अभिनेत्रीच्या मॅनेजरचा मोठा खुलासा Samantha Ruth Prabhu hospitalised,Tollywood Actress | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Samantha Ruth Prabhu hospitalised in hyderabad after myositis diagnosis spokesperson rubbish rumours

Samantha: 'समंथा हॉस्पिटलमध्ये दाखल झालीच नाही,ती तर... ',आजारी अभिनेत्रीच्या मॅनेजरचा मोठा खुलासा

Samantha Ruth Prabhu: साऊथ सुपरस्टार समंथाच्या आजारपणाविषयी गेल्या काही दिवसांत अनेक बातम्या समोर आल्या. त्यात ती उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये दाखल झाल्याचं कळालं तेव्हा तर तिचे चाहते चिंतेत पडले होते. पण आता या सगळ्या बातम्यांवर अभिनेत्रीच्या मॅनेजरनं स्पष्टिकरण दिलं आहे. (Samantha Ruth Prabhu hospitalised in hyderabad after myositis diagnosis spokesperson rubbish rumours)

हेही वाचा: KBC14: केबीसीच्या मंचावरनं अमिताभचा विवाहीत पुरुषांना खास सल्ला; म्हणाले,'बायकोच्या बाबतीत कधीच...'

त्यांच्या म्हणण्यानुसार समंथाविषयी पसरवल्या जाणाऱ्या सगळ्या बातम्या अक्षरशः खोट्या आहेत. लोक फक्त अफवा पसरवण्याचं काम करत आहेत. समंथा पूर्णपणे ठीक आहे. आणि मायोसायटिस या आजारावर योग्य उपचार घेतल्यानं आता बरी होत आहे. काही दिवस आधी समंथाने इन्स्टाग्राम पोस्टच्या माध्यमातून माहिती दिली होती की ती मायोसायटिस नावाच्या आजाराशी झुंज देत आहे. या आजारावर ती उपचार घेत आहे आणि आता बऱ्यापैकी तिनं आजारावर नियंत्रण मिळवलं आहे.

हेही वाचा: मुदत ठेवीच्या मुद्दलातून टीडीएस कपात? इथे करा तक्रार....

एका वृत्तवाहिनीशी समंथाच्या मॅनेजरनं संवाद साधला आहे. त्यानं तेव्हा म्हटलं आहे की, ''समंथा हॉस्पिटलमध्ये दाखल झालीय यासंदर्भात ज्या काही बातम्या पसरवल्या गेल्या त्या सगळ्या अफवा आहेत. यात काहीच तथ्य नाही. समंथा तिच्या घरी आहे आणि आराम करत आहे''.

हेही वाचा: कोण आहे अलीजेह अग्निहोत्री? सलमानशी आहे खास कनेक्शन

समंथाच्या सिनेमांविषयी बोलायचं झालं तर शेवटची ती 'यशोदा' सिनेमात दिसली होती. काही दिवस आधीच सिनेमा रिलीज झाला आहे. समंथाच्या या सिनेमाला चाहते आणि समिक्षकां सोबत प्रेक्षकांचाही काहीसा संमिश्र प्रतिसाद अन् प्रतिक्रिया मिळाल्याचे दिसून आलं.

हेही वाचा: Bollywood: अन् जयाप्रदांनी दलीप ताहिल यांच्या सणसणीत कानाखाली मारली.., अनेक वर्षांनी अभिनेत्याचा खुलासा

मायोसायटिस नावाच्या आजाराशी झुंज देण्याविषयी समंथानं एका मुलाखतीत म्हटलं होतं की,''आजारामुळे सध्या तिची जी परिस्थिती आहे,त्यातून बरं व्हायला तिला खूप वेळ लागेल. या जगाला सोडून सध्या तरी आपण कुठेही चाललेलो नाही''. समंथानं आपल्याला झालेल्या मायोसायटिस या आजाराविषयी एका इन्स्टा पोस्टच्या माध्यमातून आपल्या चाहत्यांना सांगितलं होतं.

तिनं लिहिलं होतं की,''यशोदा सिनेमाच्या ट्रेलरला आपण जो प्रतिसाद दिला त्याबद्दल मी आभारी राहीन. हेच प्रेम कायम ठेवा. तुमचं प्रेमच आहे जे मला आयुष्यातील कठीण प्रसंगांशी लढायचं बळ देतं. सध्या मला तुमच्या प्रेमाची आणि आशीर्वादाची नितांत गरज आहे. काही महिन्यापासून मी ऑटोम्यून कंडीशन मायोसायटिस आजाराशी झुंज देत आहे. मी विचार करत होते की जेव्हा मी पूर्णपणे ठीक होईन तेव्हा तुमच्याशी या आजाराविषयी बोलेन. पण सध्या हा आजार काही माझ्यापासून लांब जायच्या विचारात दिसत नाहीय. वाटतंय की मला याला पळवून लावायला आणखी थोडा वेळ लागेल''.

समंथानं पुढे लिहिलं होतं की,''आयुष्य मला कठीण प्रसंगांशी दोन हात करायची एक नवी शिकवण देत आहे . मी अजूनही माझ्या आजाराला स्विकारलेलं नाही. पण जसा वेळ जाईल तसा मी त्याचा स्विकार करेन. कारण मला माझ्यावर विश्वास आहे. प्रत्येक दिवस नवीन असतो. जे सुरु आहे ते निघून जाईल, यावर माझा ठाम विश्वास आहे. माझ्या आयुष्यात सध्या चांगल्या-वाईटाचा चढ-उतार सुरू आहे. मी शारिरीक आणि मानसिक रित्या स्वतःला उत्तम ठेवण्याचा प्रयत्न करतेय. डॉक्टर्सना विश्वास आहे की मी यातून लवकर बरी होईन. हा वाईट काळ आहे,निघून जाईल''.