'गली बॉय' चित्रपटाची बुसान आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात वर्णी 

संतोष भिंगार्डे
Friday, 24 July 2020

'गली बॉय' या चित्रपटाची कथा एका रॅपरभोवती फिरणारी आहे. झोपडपट्टीत राहणारा एक तरुण रॅपर होण्याची इच्छा बाळगतो आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर मोठे नाव मिळवावे, अशी त्याची इच्छा असते. ही रॅपरची भूमिका रणवीर सिंहने साकारली आहे.

मुंबई : अभिनेता रणवीर सिंह आणि अभिनेत्री आलिया भट यांटी मुख्य भूमिका असलेला गली बॉय या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली. समीक्षकांनीही या चित्रपटाचे कौतुक केले होते. एवढेच नव्हे तर 92 व्या ऑस्कर पुरस्कारासाठी या चित्रपटाची भारतातर्फे निवड करण्यात आली होती. ऑस्करच्या स्पर्धतून हा चित्रपट बाहेर पडला असला तरी अनेक राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय पुरस्कार या चित्रपटाने मिळविले आहेत. आता हा चित्रपट मानाच्या आणि प्रतिष्ठेच्या समजल्या जाणाऱ्या बुसान आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात दाखविला जाणार आहे. 

दिलासादायक...रुग्णालयात दाखल होणाऱ्या रुग्णांची संख्या घटली... 

'गली बॉय' या चित्रपटाची कथा एका रॅपरभोवती फिरणारी आहे. झोपडपट्टीत राहणारा एक तरुण रॅपर होण्याची इच्छा बाळगतो आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर मोठे नाव मिळवावे, अशी त्याची इच्छा असते. ही रॅपरची भूमिका रणवीर सिंहने साकारली आहे. या चित्रपटाचे बरेचसे चित्रीकरण धारावीत झाले आहे. झोया अख्तरने हा चित्रपट दिग्दर्शित केला आहे. चित्रपटाच्या प्रदर्शनापासूनच हा चित्रपट चर्चेत राहिलेला आहे. अनेक पुरस्कारांचा वर्षाव या चित्रपटावर झाला आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावरदेखील या चित्रपटाचे कौतुक झाले आहे.

चांगली बातमी! अखेर 'या' रुग्णांसाठी नायर रुग्णालयाचे दरवाजे खुले

मागील वर्षी दक्षिण कोरियामधील बुकियॉन इंटरनॅशनल फंटास्टिक फिल्म फेस्टिवल (बीआईएफएएन) मध्ये त्याला सर्वोत्कृष्ट आशियाई चित्रपट म्हणून एनईटीपीएसी अवार्ड मिळाले होते. आता या चित्रपटाला लोकप्रिय सिनेमा म्हणून लोकाग्रहास्तव 'रिक्वेस्ट सिनेमा स्क्रीनिंग श्रेणी'मध्ये प्रतिष्ठित अशा 'बुसान आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात' आमंत्रित करण्यात आले आहे. हा चित्रपट महोत्सव 7 ऑक्टोबर ते 16 ऑक्टोबर दरम्यान आयोजित केला आहे.
----
संपादन : ऋषिराज तायडे 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Bollywood movie gully boy selected for busan international film festival