बहुप्रतिक्षित चित्रपट 'शकिला येणार ओटीटीवर ? रिचा चढ्ढा साकारतेय महत्वाची भूमिका....

संतोष भिंगार्डे
Thursday, 6 August 2020

या चित्रपटातून वादग्रस्त शकिलाच्या आयुष्यावर बेतलेली आहे. नव्वदच्या दशकातील हा चित्रपट दाक्षिणात्य चित्रपट उद्योगातील पुरुष-प्रधान स्टार सिस्टीमवरही टीका करणारा आहे.

मुंबई : सध्या लॉकडाऊनमुळे चित्रपटगृहे, थिएटर कधी सुरु होतील याबाबत निश्चित माहिती कोणालाच नाही. त्यामुळे अनेक चित्रपट निर्माते आपला चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित करण्यावर भर दिला जात आहे. आतापर्यंत काही चित्रपट ओटीटीवर प्रदर्शित करण्यात आले. त्यानंतर आता अनेक चित्रपट प्रदर्शनाच्या वाटेवर आहे. 

मुंबईत पुन्हा महाभयंकर पाऊस होऊ शकतो, 'ही' आहे तारीख....

अभिनेत्री रिचा चड्ढा हिच्या फिल्मी करिअरमधील यावर्षीच्या बहुप्रतिक्षित चित्रपटांपैकी एक असणाऱ्या दक्षिणेतील कलाकार शकिलाच्या आयुष्यावर आधारित बायोपिक "शकिला." हा चित्रपट आता ओटीटीवर प्रदर्शित होणार आहे. अभिनेता इंद्रजित लंकेश या चित्रपटात मुख्य भूमिकेत आपल्याला दिसणार आहे. हा चित्रपट आता पूर्ण झाला असून पोस्ट प्रॉडक्शनचे काम सुरु आहे.  

मोठी बातमी : 5 ऑगस्टपासून सुरू झालेले मॉल 6 ऑगस्टपासून बंद, महापालिका आयुक्तांचा निर्णय

या चित्रपटातून वादग्रस्त शकिलाच्या आयुष्यावर बेतलेली आहे. नव्वदच्या दशकातील हा चित्रपट दाक्षिणात्य चित्रपट उद्योगातील पुरुष-प्रधान स्टार सिस्टीमवरही टीका करणारा आहे. या चित्रपटाचे निर्माते हा चित्रपट रिलीज करण्यासाठी एका ओटीटी प्लॅटफॉर्मसोबत चर्चा करत आहेत. कोरोनामुळे देशभर थिएटर बंद असल्यामुळे थिएटरमध्ये प्रदर्शनाची वाट पाहणे गुंतवणूकदारांच्या हिताचे नाही असे त्यांचे म्हणणे आहे.

महाडमध्ये आजही मुसळधार पावसामुळे पुराची भीती कायम, दरड कोसळल्याने घरांचं नुकसान

या चित्रपटाच्या डिजिटल रिलीजसाठी एका ओटीटी साईटने यापूर्वीच रस दाखवला होता. चित्रपटगृहे लवकर सुरू होण्याची शक्यता कमी आहे. हे लक्षात घेऊन आता निर्मात्यांनी ओटीटी प्लॅटफॉर्मसोबत रिलीजबाबत चर्चा सुरू केली आहे. त्यामुळे लवकरच या चित्रपटाच्या रिलीजची अधिकृत घोषणा होईल.
----
संपादन : ऋषिराज तायडे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: bollywood movie shakila will release on ott, richa chadda is in lead role