Shamshera Poster Out: 'शमशेरा' मध्ये दाढीवाला अभिनेता आहे तरी कोण? |Bollywood Movie Shamshera poster | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Bollywood Movie Shamshera poster

Shamshera Poster Out: 'शमशेरा' मध्ये दाढीवाला अभिनेता आहे तरी कोण?

Bollywood Actors: बॉलीवूडमध्ये आता वेगवेगळ्या चित्रपटांची मेजवानी प्रेक्षकांना मिळताना दिसत आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी अयान मुखर्जी (Ayan Mukherji) यांच्या ब्रम्हास्त्र चित्रपटाचा ट्रेलर समोर आला होता. तीन ते चार (Bramhastra Movie) वर्षांपासून प्रेक्षक या चित्रपटाची वाट पाहत असून तो आता सप्टेंबरमध्ये प्रदर्शित होणार आहे. त्याच्या ट्रेलरला मात्र प्रेक्षकांचा फारसा प्रतिसाद मिळाला नसल्याचे दिसून आले आहे. त्यातच आणखी एका अभिनेत्याच्या पोस्टरनं (Ranbir Kapoor) नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. समशेरा या चित्रपटातील हा लूक असून त्या अभिनेत्याच्या लूकचे कौतूक होताना दिसत आहे. अनेकांनी हा लूक पाहिल्यानंतर कोण आहे हा अभिनेता अशा प्रकारच्या कमेंट देत त्या अभिनेत्याचे कौतूक केले आहे.

बॉलीवूडचा प्रसिद्ध अभिनेता रणबीरचा शमशेरामधील तो लूक आहे. भली मोठी (Bollywood News) दाढी आणि त्याचा तो जबरी लूक प्रेक्षकांना चकीत करुन गेला आहे. एकीकडे रणबीरच्या ब्रम्हास्त्रची चर्चा असताना दुसरीकडे शमशेरच्या लूकनं हवा केली आहे. सध्या सोशल मीडियावर त्याच्या या चित्रपटाचा लूक ट्रेडिंग असल्याचे दिसून आले आहे. नुकतचं आलिया आणि रणबीरचं लग्न झालं. त्यानंतर दोघेही त्यांच्या एका प्रलंबित अशा ब्रम्हास्त्रच्या प्रोजेक्टमध्ये व्यस्त होते. कोरोनामुळे आधीच विलंब झालेल्या या चित्रपटाची प्रेक्षकांना कमालीची उत्सुकता आहे.

shamshera ranbir look

shamshera ranbir look

हेही वाचा: Tollywood Vs Bollywood: 'भाषेचं काय घेऊन बसता, सगळचं...' आलिया बिनधास्त बोलली

अयान मुखर्जी दिग्दर्शित ब्रम्हास्त्रमध्ये भली मोठी स्टारकास्ट आहे. त्यात अमिताभ बच्चन, नागार्जुन, मौनी रॉय, रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यांच्या नावांचा समावेश आहे. प्रत्यक्षात ब्रम्हास्त्रचा जेव्हा ट्रेलर प्रदर्शित झाला तेव्हा मात्र प्रेक्षकांनी नाराजी व्यक्त केली. आता रणबीर कपूर, वाणी कपूर आणि संजय दत्त यांच्या भूमिका असलेला शमशेरा हा येत्या वर्षात प्रदर्शित होणार असल्याचे सांगण्यात आले आहे. त्याचा फर्स्ट लूक प्रेक्षकांसमोर आला आहे.

हेही वाचा: Ranbir Alia लग्नानंतरच्या पार्टीचा व्हिडीओ व्हायरल, पहा कपलचा भन्नाट डान्स

Web Title: Bollywood Movie Shamshera Poster Ranbir Kapoor Look Viral Social Media Sanjay Dutt

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top